Eknath Shinde News  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena News: मोठी बातमी! शिवसेना भवन, शाखा, पक्ष निधी शिंदेंच्या शिवसेनेला द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका

Shivsena News: निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव दिलं आहे.

रुपेश नामदास

Shivsena News: निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णया नंतर उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुप्रिम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

शिंदे गटाला शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा, आणि पक्षाचा निधी मिळावा, यासाठी एका वकीलाने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली असून त्यावर २४ एप्रिलला सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.

शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. याचा आधार घेत वकील.आशिष गिरी यांच्याकडून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये शिवसेनेच्या संपत्तीवर दावा करण्यात आला आहे.

तसेच शिवसेना भवन, मुंबईमधील शिवसेनेच्या शाखा आणि पक्षाचा पक्षनिधी शिंदे गटाच्या शिवसेनेकडे वर्ग करण्याची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.

मुळ शिवसेनेची मोठा पक्षनिधी आहे. याशिवाय शिवसेनेच्या अनेक संस्था, कार्यालयं, शाखा आहेत. त्यावर कोणाचा हक्क याकडे न्यायालय याकडे कशा प्रकारे पाहतं हे महत्त्वाचं आहे. शिवसेना पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या नावे बँक खातं केवळ शिवसेनेचं असेल, तर त्याचे सर्व अधिकार शिंदे गटाला जातात. त्यामुळे तो पक्षनिधी शिंदे गटाकडे वर्ग करा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT