पेट्रोलची मूळ किंमत 50! मग महाराष्ट्रात का द्यावे लागतात 113 रुपये? esakal
महाराष्ट्र बातम्या

पेट्रोल 49.02 तर डिझेलची मूळ किंमत 50.50 रुपये! पण, द्यावे लागतात 113 रुपये

जुलै 2022 पासून जीएसटी अनुदान मिळणार नसल्याने राज्याच्या तिजोरीतील महसूल 20 हजार कोटींनी कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवरील टॅक्‍स कमी करणे पडवणार नाही, असे वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जुलै 2022 पासून केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारे 20 हजार कोटींचे जीएसटी अनुदान बंद होणार आहे. राज्य सरकारला पेट्रोल, डिझेलमधून दरवर्षी 25 हजार कोटींचा महसूल मिळतो. जीएसटी अनुदान बंद होणार असल्याने इंधनावरील टॅक्‍स कमी केल्यास राज्याला मोठा फटका बसू शकतो, असे वित्त विभागाने म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कोणताही कर कमी न करता सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित करात 1 एप्रिलपासून तीन टक्‍क्‍यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सध्या 43 लाख किलोलीटर एवढा पेट्रोलचा तर 97 लाख किलोलीटर डिझेलचा खप आहे. त्यातून राज्य सरकारला करापोटी 25 हजार कोटींचा महसूल मिळतो. तरीही, पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे, यासाठी केंद्राकडून प्रयत्न झाले. मात्र, इंधन हे राज्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असल्याने बहुतेक राज्यांनी त्याला विरोध केला. दुसरीकडे कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने केंद्र सरकारने जीएसटी अनुदान आणखी दोन वर्षे द्यावे, अशी मागणी केली. त्यावर केंद्र सरकारने तोंडावर बोट ठेवले. आता जुलै 2022 पासून जीएसटी अनुदान मिळणार नसल्याने राज्याच्या तिजोरीतील महसूल 20 हजार कोटींनी कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवरील टॅक्‍स कमी करणे पडवणार नाही, असे वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका आहे. दरम्यान, जीएसटी अनुदान बंद झाल्यानंतर होणारी महसुली घट मद्यविक्री व मालवाहतूक व्यवसायातून भरून काढली जाऊ शकते, याचेही नियोजन सुरु आहे. तुर्तास राज्य सरकारने ऑटोरिक्षा, टॅक्‍सी व प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसाठी सीएनजी इंधनावरील टॅक्‍स तीन टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याने वित्तमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून राज्य सरकारने सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कर तीन टक्‍क्‍यांनी कमी केला आहे. जुलै 2022 पासून केंद्राकडून जीएसटी अनुदान मिळणार नसल्याने महसुलातील 20 हजार कोटींची तुट भरून काढण्याचे नियोजन सुरु आहे.
- मंदार केळकर, उपसचिव, महाराष्ट्र

  • इंधनावर राज्याचाच कर सर्वाधिक
    - पेट्रोलची मूळ किंमत 49.02 रुपये तर डिझेलची मूळ किंमत 50.50 रुपये
    - डिझेलवर केंद्र सरकारचा 21.80 रुपये तर पेट्रोलवर 27.90 रुपयांचा सेस
    - पंपचालकांना प्रतिलिटर पेट्रोलवर 3.68 रुपये तर डिझेलवर 2.58 रुपयांचे कमिशन
    - राज्य सरकारचा पेट्रोलवर 31.07 रुपये तर डिझेलवर 20.97 रुपयांचा टॅक्‍स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेळगावात ऊस आंदोलनाला हिंसक वळण! संतप्त शेतकऱ्यांतर्फे दगडफेक, पोलिसांकडून लाठीहल्ला

Ladki Bahin : लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीत तांत्रिक अडथळे; लाभार्थी महिलांचा संताप!

voters duplicate names: चिपळूणमधील मतदार यादीतून ४०० दुबार नावे हटवली; निवडणूक तयारीसाठी अंतिम यादी अद्ययावत

Mumbai News: मुंबईत भारतातील पहिले मॅन्ग्रोव्ह पार्क तयार! पर्यटकांसाठी कधी आणि कुठे खुले होणार? जाणून घ्या खासियत...

Crime: धक्कादायक! रुग्णालयात कामाचा ताण वाढला; १० रुग्णांना संपवलं, तर अन्य २७ जणांना... नर्सचा भलताच कांड वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT