phone tapping case mumbai police record statement of shivsena leader mp sanjay raut  Esakal
महाराष्ट्र बातम्या

फोन टॅपिंग प्रकरण : एकनाथ खडसेंनंतर आज संजय राऊतांनी नोंदवला जबाब

सकाळ डिजिटल टीम

फोन टॅपिंग (Phone Tapping Case) प्रकरणात संजय राऊतांचा (MP Sanjay Raut यांचा आज सामना वृत्तपत्राच्या कार्यालयात मुंबई पोलिसांना जबाब नोंदवला, याआधी राऊत हे जवाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहणार नाहीत तर, संबंधित तपास अधिकारी राऊत यांना भेटून जवाब नोंदवणार आहेत अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी सामनाच्या कार्यालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. आज या प्रकरणात शिवसेना खासदार संजय़ राऊत यांचा जबाब नोंदवला आहे, मविआ सरकारच्या सत्ता स्थापनेच्या काळात संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप झाल्याचा समोर आले होते. या प्रकरणी 2 मार्च रोजी कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी संजय राऊत याच्यासोबत नेमकं काय झालं होतं याबद्दल माहिती घेण्यासाठी हा जबाब नोंदवण्यात आला. एकनाथ खडसेंचा जबाब नोदवल्यानंतर त्यातून बरीच नवीन माहिती मिळाली होती, तशीच वेगळी माहिती गोळा करण्याचा मुंबई पोलिस प्रयत्न करत आहेत. यापुर्वी एकनाथ खडसे यांचा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आहे, तर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना हा फोन टॅपिंगचा प्रकार झाला. दरम्यान अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांच्या तक्रारीवरून आयपीसीच्या कलम १६५ आणि टेलिग्राफ कायद्याच्या कलम २६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीने आणखी एकाने जीवन संपविले

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT