nawab malik news Sakal
महाराष्ट्र बातम्या

फोन टॅपिंग प्रकरण: नवाब मलिकांचा जबाब नोंदवण्याची न्यायालयाची परवानगी

नवाब मलिकांचा जबाब नोंदवण्याची परवानगी न्यायालयाकडून मुंबई पोलिसांनी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात नवाब मलिकांचा जबाब नोंदवण्याची परवानगी न्यायालयाकडून मुंबई पोलिसांनी दिली आहे. राज्यभरामध्ये फोन टॅपिंगटचे प्रकरण गाजत आहे. आता मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची शाखा यासंदर्भात मलिकांची चौकशी करणार आहे.

(Nawab Malik Phone Tapping Case)

रश्मी शुक्ला यांच्या संबंधित फोन टॅपिंगचा आरोप नवाब मलिकांनी केले होते. या प्रकरणात त्यांच्याकडे कोणती माहिती आहे हे पोलिसांना जाणून घ्यायचे होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी चालू केली होती. पण मागील काही दिवसांत त्यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे मलिकांचा जबाब मुंबई पोलिसांना नोंदवण्यात आला नव्हता. या प्रकरणात जबाब नोंदवण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

सध्या नवाब मलिक हे कोर्टाच्या परवानगीने मुंबईतील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. पण पोलिस आता रूग्णालयात जावून जबाब नोंदवणार की, त्यांची रूग्णालयातून सुटका होण्याची वाट पाहणार हे बघावं लागणार आहे.

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तात्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान परवानगी घेऊन त्यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचं सांगितलं होतं. त्यांनतर तुम्हा मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल मलिकांनी विचारला होता.

त्यानंतर वकिलांनी शासकीय परवानगीने फोन टॅपिंग केल्याचा खुलासा केला होता पण त्यांनी दिशाभूल करून परवानग्या घेतल्या होत्या. देशद्रोह, राजद्रोहाच्या नावाखाली शुक्ला यांनी फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या होत्या असा आरोप मलिकांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT