On November 17 Trupti Desai will go to Shabarimala 
महाराष्ट्र बातम्या

Trupti Desai: "मोदींचे विरोधक काहीतरी पसरवत आहेत"; नव्या संसदेतील साधुंच्या फोटोवरुन तृप्ती देसाईंचा निशाणा

तर मोदींनी चुकीचं काय केलं? असा सवालही तृप्ती देसाई यांनी विचारला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : नव्या संसद भवनाचं उद्घाटनं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि अनेक साधुंच्या हस्ते हिंदू धार्मिक मंत्रोच्चार, पुजाअर्चेद्वारे पार पडलं. या प्रकारानंतर मोदींच्या विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीकाही केली.

भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या मंत्रीमंडळाचा एकत्रित फोटो आणि नव्या संसद भवनातील मोदींसह साधुंचा एकत्र फोटो पोस्ट करत विरोधकांनी सोशल मीडियातून जोरदार टीका केली होती.

पण या वादामध्ये आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी उडी घेतली असून त्यांनी मोदी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. (PM Modi opponents are spreading something Trupti Desai on photo of sadhus in new parliament)

तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबूक पोस्टद्वारे मोदींच्या विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलं की, "देश हा संविधानावरच चालणार आहे. कृपया हे फोटो टाकून गैरसमज पसरवू नये. मोदीजींनी आज साधू संतांना सन्मान दिला म्हणजे साधुसंतच संसद चालवणार आहेत असं नाही, पण मोदींचे विरोधक असं काहीतरी पसरवत आहेत. मी काही मोदींची फार मोठी समर्थक नाही आणि फार मोठी विरोधकही नाही. परंतू ज्यांच्या आशीर्वादामुळं मोदीजी या पदावर आहेत त्यांच्या हस्ते त्यांना पूजा करावीशी वाटली असेल तर अयोग्य काय? आपल्या देशात घटना सर्वोच्च आहे आणि घटनेनुसारच देश चालणार आहे"

दरम्यान, विरोधकांनी जे फोटो पोस्ट करत मोदींवर टीका केली आहे. त्या फोटोमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या मंत्रीमंडळातील नेते मंडळींनी एकत्रित बसून संसदेच्या इमारतीमध्ये फोटो काढलेला आहे. तर दुसऱ्या फोटोत नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर मोदींनी साधुंबरोबर काढलेला फोटो आह. या दोन्ही फोटोंची तुलना करत देश अधोगतीकडं चालला असल्याची टीका विरोधकांनी केली होती. अनेकांनी हे दोन्ही फोटो एकत्रितरित्या पोस्ट करत आपला विरोध दर्शवला होता.

नव्या संसद भवनाचा लोकार्पण सोहळा वादामुळेच जास्त गाजला. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना डावलून मोदींनी स्वतःच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन घडवून आणलं यामुळं प्रमुख विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. तसेच राजेशाहीचं प्रतिक असलेल्या सेंगोल अर्थात राजदंडाच्या प्रतिष्ठापणेमुळंही अनेकांनी मोदींवर टीका केली होती. हा राजदंड तामिळनाडूतील साधुंच्या हस्ते विधीवत पुजाअर्चा करत मोदींनी त्याची लोकसभेत प्रतिष्ठापणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! 'साेलापुरात आयटीपार्कसाठी उद्याेजकच जागा निवडणार'; हैदराबाद, पुण्यातील उद्योजकांचा लवकरच दौरा

Ganeshotsav 2025: गणपतीची सोंड उजवी की डावी? शास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या!

Dog Rescue: ‘ती’ने पिलांना काढले मृत्यूच्या दाढेतून बाहेर; पहाडसिंगपुऱ्यात ‘श्वान परिवारा’च्या मदतीसाठी सरसावले स्थानिकांचे हात

World Archery 2025: महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला ब्राँझ; जागतिक तिरंदाजी स्पर्धा, भारतीय खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी

IndiaA VS AustraliaA: चारदिवसीय लढतीत भारत अ संघाचा पराभव; यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाची बाजी

SCROLL FOR NEXT