Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Reservation: 'मराठा, धनगर आरक्षणासाठी पंतप्रधान सकारात्मक'; खासदार निंबाळकर, उदयनराजेंनी घेतली मोदींची दिल्लीत भेट

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षण मागण्यासंदर्भात माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.

सकाळ वृत्तसेवा

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षण मागण्यासंदर्भात माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज भेट घेतली. यावेळी आरक्षणाच्या प्रश्‍नावर सकारात्मक चर्चा झाली. सोमवारी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची बैठक झाली. त्याच पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीची वेळ मागितली होती.(Marathi Tajya Batmya)

भेटीदरम्यान खासदार छत्रपती उदयनराजे व खासदार नाईक-निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षण मागणीवर त्यांच्याशी चर्चा केली. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका स्पष्ट केली. तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये

मराठा, धनगर आरक्षणासाठी पंतप्रधान सकारात्मक

आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी हा समाज अनेक वर्ष झटत आहे. इतर राज्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे. परंतु महाराष्ट्रात शब्दांचा खेळ झाला आहे. महाराष्ट्रात धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही, तरी याबाबत लक्ष घालावे, अशी विनंती केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिल्याचे खासदार नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.(Latest Maharashtra News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नववर्ष स्‍वागताच्या जल्लोषावर पोलिसांची करडी नजर; नियम मोडल्‍यास कारवाई

Latest Marathi News Live Update : नागपुरात वंचितची काँग्रेससोबत आघाडीत -बिघाडी

Indian Post: लिखित परीक्षा नाही! भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम मुदत काय?

नागपूर हादरलं! कुऱ्हाडीने वार करून पत्नी, चार वर्षाच्या मुलाची हत्या; जिल्ह्यात उडाली खळबळ, थरारक घटना..

BEST Bus Accident : लोक खरेदी करत होते, तेवढ्यात बस आली अन्...; भांडूप बस अपघाताचा CCTV VIDEO समोर

SCROLL FOR NEXT