महाराष्ट्र बातम्या

PM Modi Shirdi Visit : PM मोदी उद्या महाराष्ट्र-गोवा दौऱ्यावर! शिर्डी दर्शनानंतर करणार सुमारे 'या' प्रकल्पांचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी गे २६ ऑक्टोबर रोजी एक दिवसाच्या महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर असणार आहेत.

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी गे २६ ऑक्टोबर रोजी एक दिवसाच्या महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान मोदी हे या दौऱ्यात दुपारी एक वाजता शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजा देखील करणार आहेत. यानंतर अहमदनगर मध्ये सव्वा दोन वाजता निलवंडे धरणाचे जलपूजन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे.

इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी हे साई मंदिरात पूजा आणि दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन देखील करतील. आपल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी राज्यात सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३ वाजून ३० मिनीटांनी शिर्डीच्या काकडी ग्राउंडवर कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन देखील करतील. यानंतर पीएम मोदी शिर्डीहून गोव्याला जाणार आहेत. गोव्यातील फतोर्डा स्टेडियमवर पंतप्रधान मोदी संध्याकाळी ६ वाजता ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करतील.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सांगितलं की, गोव्यात जन्मलेल्या भारतीय प्रोफेशनल विंड सर्फर कात्या इडा कोएल्हो गुरुवारी येथे ३७व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मशाल सुपूर्द करतील. सीएम सावंत यांनी सांगितले की, फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पाच तास चालणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळ्यात सुखविंदर सिंग आणि हेमा सरदेसाई यांच्यासह राज्यातील प्रसिद्ध कलाकार सादरीकरण करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT