PM Modi Present Lata Mangeshkar Funeral e sakal
महाराष्ट्र बातम्या

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला PM मोदी राहणार उपस्थित

भाग्यश्री राऊत

मुंबई : भारताच्या गानकोकीळा लता मंगशेकर (Lata Mangeshkar Passes Away) यांचं आज निधन झालं. त्यांनी ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी (PM Modi) उपस्थित राहणार आहेत.

शिवाजी पार्कवर लता दीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदी आज सायंकाळी चार वाजता मुंबईत दाखल होतील. त्यानंतर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उपस्थित राहतील, अशी माहिती मिळाली आहे.

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिरही झाली होती. मात्र, ५ फेब्रुवारीला अचानक प्रकृती खालावल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मंगेशकर कुटुंबातील अनेकांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. आज सकाळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ब्रीच कँडीमध्ये जाऊन लता मंगेशकर यांच्या तब्येतीची माहिती घेतली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लता मंगेशकर यांचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर राष्ट्रपतींपासून तर पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वच दिग्गजांनी दिदींना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ''लता मंगेशकर यांच्या निधनाने झालेलं दु:ख शब्दांच्या पलिकडे आहेत. लता दिदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने देशात मोठी पोकळी निर्माण झालीय, ती भरून काढता येणार नाही. येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्या कायम स्मरणात राहतील. लता मंगेशकर यांच्या आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय अशी क्षमता होती.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT