PM Modi wishes CM Devendra Fadnavis on his birthday
PM Modi wishes CM Devendra Fadnavis on his birthday  
महाराष्ट्र

वाढदिवशीच मोदींनी फडणवीसांचे केले भरभरून कौतुक!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस! अनेक मान्यवरांनी फडणवीसांना त्यांच्या वाढदिसानिमित्त दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात. पण या सगळ्या शुभेच्छांमध्ये सर्वात खास ठरल्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा! मोदींनी फडणवीसांना केवळ शुभेच्छाच नाही दिल्या, तर त्यांचे भरपूर कौतुकही केले आहे.

मोदींनी फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त ट्विट केले आहे. 'सर्वात उत्साही गुणवान असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या 5 वर्षांत त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर अग्रस्थानी ठेवले आहे. गरिबांच्या राहणीमानात विकास व्हावा यासाठी त्यांचे काम जोरात सुरू आहे. त्यांना दिर्घायुष्य लाभो व पुढील अनेक वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी लाभो या शुभेच्छा!' अशा शब्दांत मोदींनी फडणवीसांचे कौतुक केले आहे.

कालच फडणवीसांनी मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे, असे सांगत मुख्यमंत्रीपदाच्या वादाला तात्पुरता का होईना पण पूर्णविराम दिला होता. त्यामुळे फडणवीस हे अत्यंत धडाडीचे नेते आहे असे सर्वांचेच मत आहेत आणि अशातच मोदींनीही त्यांचे कौतुक केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT