Milind Narvekar Sudha Murty Sakal
महाराष्ट्र बातम्या

British PM : ऋषी सुनक पंतप्रधान होताच मिलिंद नार्वेकरांचा सुधा मूर्तींना फोन

ऋषी सुनक हे सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि त्याची चर्चा जगभर होऊ लागली. सुनक यांची पंतप्रधानपदी निवड होताच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुधा मूर्ती यांना थेट फोन केला आहे. ट्वीट करत नार्वेकरांनी याविषयीची माहिती दिली आहे.

मिलिंद नार्वेकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, "तिरुपती देवस्थानाच्या माजी सदस्या श्रीमती सुधा मूर्ती यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनल्याबद्दल मूर्ती परिवाराला माझ्या शुभेच्छा दिल्या". ऋषी सुनक हे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई आहेत.

ऋषी सुनक भारतीय वंशाचे आहेत. त्यांचे आई वडील पंजाबी ब्राह्मण होते. ते इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. २००९ मध्ये सुनक यांनी या दोघांची मुलगी अक्षताशी बंगळुरूमध्ये विवाह केला. या दोघांना दोन मुली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधू शिवाजी पार्कवर दाखल, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राचा भाऊ आला रे आला! रितेश देशमुखची ग्रँड एंट्री

Crime: पालकांनी पोटच्या अल्पवयीन मुलीला क्रूरपणे संपवलं; नंतर रात्री अंत्यसंस्कार, धक्कादायक कारण समोर

IND vs NZ: किंग कोहलीची घौडदौड कायम; रचला आणखी एक विश्वविक्रम; सचिन तेंडुलकर, संगकाराला टाकलं मागे

Employees DA: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT