crime news  esakal
महाराष्ट्र बातम्या

तलवारीने केक कापण्याचा पराक्रम, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह चौघांना पोलिसांनी काढलं शोधून

वाढदिवसाचे केक तलवारीने कापल्याच्या अनेक घटना घडत आहेत

शर्मिला वाळुंज

Dombivli: शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेश असतानाही ग्रामीण भागात अनेक नागरिक वाढदिवस किंवा इतर कार्यात शस्त्र हातात नाचवून त्याचे प्रदर्शन करताना दिसत आहेत. वाढदिवसाचे केक तलवारीने कापल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊनही तलवारीने केक कापण्याची हौस कमी होताना दिसत नाही.

हेही वाचा- शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

दहिसर येथेही पुन्हा अशीच घटना घडली असून तलवार जवळ बाळगून त्याने केक कापून त्याचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल केल्याप्रकरणी शिळ डायघर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यामध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी जीवन वालीलकर (वय 35) यांचा समावेश आहे. चौघांची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विनापरवाना जवळ शस्त्र बाळगणे हा गुन्हा असून देखील याचे उल्लंघन ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात केले जात आहे. वाढदिवसाला, लग्नकार्य किंवा इतर काही समारंभात हातात तलवार, बंदूक घेऊन प्रदर्शन करणे ही आजकाल एक फॅशन झाली आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल होऊनही त्याचे फारसे गांर्भिय कोणाला दिसत नाही.

हेही वाचा: Border Dispute: शिंदे सरकारच्या मंत्र्याकडून जतमध्ये घोषणांचा पाऊस; मात्र महिलेच्या मागणीने वेधलं लक्ष

अशीच एक घटना उघडकीस आली आहे. दहिसर येथील काही तरुण तलवारीने केक कापत असताना व तलवारी जवळ बाळगणाऱ्या व्यक्तींचे फोटो समाज माध्यमावर दोन तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. याची चर्चा गावभर होऊ लागल्याने व्हायरल फोटो वरुन शिळ डायघर पोलिसांनी गुन्हे दाखल करत तरुणांचा शोध सुरु केला.

दहिसर मोरी येथे राहणारे जीवन वालीलकर (वय 35), मोहमंद गुलजार पिरमोहंमद खान उर्फ राहूल उर्फ काल्या (वय 23), मोहंमद सोहेल रईस खान (वय 40) णि मोहमंद राशिद अब्दुल शाह (वय 38) या चौघांना पोलिसांनी पाच तासात अटक केली. त्यांच्याकडून एकूण 4 तलवारी पोलिसांनी हस्तगत केल्या असून एकूण 3 गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. या चौघांची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती शिळ डायघर पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT