Police Bharti esakal
महाराष्ट्र बातम्या

Police Bharti : पोलिस भरती परीक्षेत हायटेक कॉपी; कानात लावले मायक्रो हेडफोन, तपास सुरु

संतोष कानडे

मुंबईः पोलिस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेमध्ये हायटेक कॉपी झाल्याचे पुरावे मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणाचा कसून तपास पोलिसांनी सुरु केला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

मुंबईत पोलिस भरती लेखी परिक्षेत हायटेक कॉपी झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. ७ मे रोजी मुबंईत पोलिस भरतीचा पेपर झाला. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडे अत्याधुनिक यंत्र होतं. प्रश्न पत्रिकांचे फोटो बटन कॅमेऱ्याद्वारे केंद्राबाहेर आले. परीक्षा केंद्रातून मेलद्वारे हे फोटो बाहेर आल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यानंतर काही मिनिटांतच केंद्राबाहेरील शिक्षकांनी मायक्रो हेडफोनच्या माध्यामातून उत्तरं दिली. काही उमेदवारांच्या कानामध्ये मायक्रो हेडफोन होते. त्याद्वारे त्यांना उत्तरं मिळत गेली. याप्रकरणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. संघटनेकडे पुढच्या तपासासाठी अधिकचे पुरावे मागितले आहेत.

मागच्या काही वर्षांपासून राज्यात भरती प्रक्रियेला खोडा बसलेला आहे. एखाद्या विभागासाठी जागा निघाल्या तर त्यात गोंधळ उडतो. पोलिस भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. मयक्रो डिव्हाईसच्या माध्यमातून हे पेपर फुटल्याचा प्रकार घडल्याचा संशय आहे. मुंबई पोलिस प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT