solapur city cp driver

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

पोलिस आयुक्तांच्या वाहनचालकाचा रेकॉर्ड! दररोज धावतो २१ किलोमीटर, आतापर्यंत जिंकल्या ५५ पेक्षा जास्त मॅरेथॉन; आता ‘सकाळ’तर्फे आयोजित २ नोव्हेंबरच्या मॅरेथॉनमध्येही धावणार

धावण्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती कायम रहाते या हेतूने पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या शासकीय वाहनाचे चालक अंमलदार लगमण्णा माळी (रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) हे दररोज २१ किमी धावतात. वयाची चाळिशी सुरू असूनही त्यांचा हा सराव अखंडित आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : धावण्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती कायम रहाते या हेतूने पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या शासकीय वाहनाचे चालक अंमलदार लगमण्णा माळी (रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) हे दररोज २१ किमी धावतात. वयाची चाळिशी सुरू असूनही त्यांचा हा सराव अखंडित आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल ५५ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन त्यात पारितोषिके पटकावली आहेत. आता ते ‘सकाळ’तर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये पोलिस आयुक्तांसमवेतही धावणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातून पोलिस गेममध्ये क्रॉस कंट्रीत सलग दोन वर्षे गोल्ड मेडल, हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन, अल्ट्रा मॅरेथॉन, अल्ट्रासायक्लोतन व कॉम्रेड अशा स्पर्धांमध्ये मेडेल्स पटकावणारे लगमण्णा एकमेव आहेत. सोलापूर-धाराशिव बार्शी, सातारा, सांगली, पंढरपूर, कोल्हापूर, मुंबई, विजयपूर अशा मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून त्यांनी बक्षिसे जिंकली आहेत. त्यांचा अजूनही सराव चालू आहे.

दररोज २१ किमी हाफ मॅरेथॉनचा सराव करून त्यांनी अनेक पारितोषिकांवर आपले नाव कोरले आहे. आता मॅरेथॉन मुंबई, बारामती, पुणे येथे होणाऱ्या मॅरेथॉनचा ते सराव करीत आहेत. तत्पूर्वी, २ नोव्हेंबरला सोलापूर शहरात होणाऱ्या ‘सकाळ’च्या मॅरेथॉनमध्येही धावणार आहेत.

पोलिस आयुक्तांचे पाठबळ अन्‌...

धावण्याचा सराव पाहून पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी ‘तुम्ही कॉम्रेड करा, कमी वेळात चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हाल’ असा विश्वास दिला. ‘तुम्ही सराव सुरू करा मी आहे’ असे पाठबळही त्यांनी दिले. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत त्यांनी पोलिस आयुक्त व साताऱ्यातील प्रशिक्षक शिवसप्रीत यांच्या मार्गदर्शनाखाली लगमण्णा यांनी सराव केला. दक्षिण आफ्रिका येथे ८ जून रोजी झालेल्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. त्यात ९० किलोमीटर अंतर १२ तासात पूर्ण करणे अपेक्षित होते. स्पर्धेत जगभरातून २७ हजारांवरून तर भारतातील ४५० हून अधिक धावपट्टू होते. यात लगमण्णा यांनी ९० किमी अंतर अवघ्या आठ तास ४७ मिनिटांमध्ये पूर्ण करत भारतातील धावपट्टूंमधून १६ वा क्रमांक मिळवत ‘बिल रोहन’ मेडल पटकाविले.

लगमण्णा माळी म्हणतात...

  • मी दरमहा किमान ५०० किमी धावतो

  • आत्तापर्यंत जगभरातील ५५ पेक्षा जास्त मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नोंदवला सहभाग

  • पाच, दहा, २१, ४२ किमी व ५०, ६५, ७६, ७७ किमी हाफ आयर्न मॅरेथॉमध्येही सहभाग

  • दोन किमी पोहणे व ९० किमी सायकल चालवण्याचाही आहे अनुभव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Sonography: कारमध्येच करायचे सोनोग्राफी! नाशिकमध्ये अवैध गर्भलिंगनिदान करणारं रॅकेट उघडीकस, कंपनीवरही गुन्हा

Latest Marathi News Live Update : धमकी देऊन कोणीही विकासाचे राजकारण करू नये, महसूल मंत्र्यांचा मकरंद पाटील यांच्यावर टीका

तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अभिनेत्यासोबत रोमान्स, लंडनच्या गुलाबी थंडीतील व्हिडिओ, ट्रेलर चर्चेत

Horoscope Prediction : 7 डिसेंबरपासून मंगळ बदलणार त्याची चाल; 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु, प्रोमोशन नक्की !

Weight Loss Plan : पोटभर भात-भाकरी-ब्रेड खावूनही 7 दिवसांत कमी केले 1.7Kg वजन; तुम्हीही फॉलो करू शकता ही स्मार्ट पद्धत

SCROLL FOR NEXT