गणेश विसर्जन मिरवणूक sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरकरांसाठी पोलिसांचे आदेश! शनिवारी ९ मध्यवर्ती गणेशेत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका; शहरातील ‘हे’ मार्ग सकाळी ६ ते रात्री १२पर्यंत राहणार बंद

घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन व मध्यवर्ती महामंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते. त्यामुळे मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होईल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गांवरून अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय अन्य कोणत्याही वाहनास परवानगी नसणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील नऊ मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांकडून शनिवारी (ता. ६) विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुकीस परवानगी असणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गांवरील वाहतूक शनिवारी सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक त्या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत बंद ठेवली जाणार असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.

घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन व मध्यवर्ती महामंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते. त्यामुळे मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होईल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गांवरून अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय अन्य कोणत्याही वाहनास परवानगी नसणार आहे, असे शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या मार्गावरील वाहनांसाठी दरवर्षीप्रमाणे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री १२ नंतर पूर्वीप्रमाणे वाहतूक सुरू राहील, असेही आदेशात नमूद आहे.

  • नऊ मध्यवर्ती मंडळांचे मिरवणूक मार्ग...

  • १) लोकमान्य गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळ : मिरवणूक पत्रा तालीम येथून निघेल. त्यानंतर सळई मारुती- गवंडी गल्ली- मल्लिकार्जुन मंदिर- बाळीवेस- तरटी नाका पोलिस चौकीसमोरून- छत्रपती शिवाजी महाराज चौक- मॅकेनिक चौक- सरस्वती चौक- लकी चौक- आसार मैदान- गणपती घाट अशी ही मिरवणूक निघणार आहे.

  • २) मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ : दत्त चौकातून निघालेली मिरवणूक पुढे राजवाडे चौक- गंगा विहीर- चौपाड- विठ्ठल मंदिर- बालाजी मंदिर- पंजाब तालीम, मल्लिकार्जुन मंदिर- बाळीवेस- चाटी गल्ली- मंगळवार पेठ पोलिस चौकीसमोरून मधला मारुती- माणिक चौक- कसबा पोलिस चौकी- खाटीक मशीद- दत्त चौक- गणपती घाट.

  • ३) पूर्व विभाग मध्यवर्ती मंडळ : कन्ना चौकातून मिरवणूक निघेल. पुढे जुनी जोडभावी पेठ पोलिस चौकी- नेताजी नगर- भुलाभाई चौक- मार्कंडेय चौक- जोडबसवण्णा चौक- भद्रावती पेठ- मार्कंडेय सहकारी रुग्णालय- आंध्रदत्त चौक- कुचन नगर- पद्मशाली चौक- जगदंबा चौक- जेलरोड पोलिस ठाणे- किडवाई चौक- बेगम पेठ पोलिस चौकी- पंचकट्टा- विष्णू घाट.

  • ४) लष्कर विभाग मध्यवर्ती महामंडळ : नळ बाजार चौकातून निघालेली मिरवणूक पेंढारी मशीद- मुर्गी नाला- सतनाम चौक- कुंभार गल्ली- मौलाली चौक- जगदंबा चौक- हुमा मेडिकल- सात रस्ता- शासकीय दूध डेअरी- पत्रकार भवन चौकमार्गे धर्मवीर संभाजी तलाव.

  • -------------------------------------------------------------------------------

  • ५) विजापूर नाका मध्यवर्ती मंडळ : सैफूल चौकातून पुढे इंचगिरी मठ- संत रोहिदास चौक- आयटीआय पोलिस चौकी- जुना विजापूर नाका- धर्मवीर संभाजी तलाव.

  • ६) होटगी रोड मध्यवर्ती मंडळ : हत्तुरे वस्ती- मजरेवाडी- आसरा चौक- महिला हॉस्पिटल चौक- महावीर चौक- पत्रकार भवन चौकातून पुढे धर्मवीर संभाजी तलाव. दुसरा मार्ग हत्तुरे वस्ती- आसरा चौक- डी मार्ट- दावत चौक- भारती विद्यापीठ- संत रोहिदास चौक- आयटीआय पोलिस चौकी- धर्मवीर संभाजी तलाव.

  • ७) घरकूल मध्यवर्ती मंडळ : पंचमुखी देवस्थान- वैष्णवी मारुती मंदिर चौक- संभाजी शिंदे हायस्कूल समोरून पुढे पोषम्मा चौक- महालक्ष्मी चौक- सागर चौक- विजय मारुती चौक- नवनीत चौकातून वळसा घेऊन गणेश मंदिर- बी ग्रूप- श्रीनेत्र चौकातून म्हाडा विहीर.

  • ८) निमल नगर मध्यवर्ती मंडळ : दुर्गादेवी मंदिर- निलम नगर- सिद्धेश्वर चौक- आमदार दिलीप माने यांचे संपर्क कार्यालय- मानाचा शिवगणेश मंदिर- करली चौक- बनशंकरी हॉटेल- गवळी वस्ती- परळकर विहीर.

  • ९) बाळे मध्यवर्ती मंडळ : बाळे परिसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis on cabinet subcommittee : मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा! मंत्रिमंडळ उपसमितीचं फडणवीसांकडून विशेष कौतुक, म्हणाले...

KCR News : केसीआर यांनी स्वत:च्या मुलीची पक्षातून केली हाकालपट्टी; BRS मधील अंतर्गत वादाला नवे वळण

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या यशस्वी आंदोलनानंतर शिरूरमध्ये जल्लोष, गुलाल उधळून साजरा

Ajit Pawar : करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखलंच नाही; दादांचा संताप, VIDEO VIRAL

Pune News : पुण्यात पुराचा धोका वाढला; नदीची वहन क्षमता घटल्याने ४०% वाढ

SCROLL FOR NEXT