police bharati sakal news
महाराष्ट्र बातम्या

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

राज्यात सप्टेंबरपासून १५ हजार ६३१ पोलिस शिपाई, चालक, सशस्त्र पोलिस शिपाई, बॅण्डस्मन व कारागृह शिपाई या पदांसाठी एकत्रित भरती राबविली जाणार आहे. सुरवातीला मैदानी चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात सप्टेंबरपासून १५ हजार ६३१ पोलिस शिपाई, चालक, सशस्त्र पोलिस शिपाई, बॅण्डस्मन व कारागृह शिपाई या पदांसाठी एकत्रित भरती राबविली जाणार आहे. सुरवातीला मैदानी चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. अर्ज भरण्यास सप्टेंबरमध्ये सुरू होऊन ऑक्टोबरमध्ये मैदानी चाचणी होतील.

राज्याच्या गृह विभागाने १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळातील रिक्त होणाऱ्या पोलिसांची पदे भरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या पदभरतीसाठी राज्यभरातून १५ लाखांहून अधिक अर्ज येतील असा अंदाज आहे. दरम्यान, आता भरतीचा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ‘प्रशिक्षण व खास पथके’चे अपर पोलिस महासंचालक एक सेवा पुरवठादार कंपनी निवड करणार आहेत. त्या कंपनीच्या माध्यमातून अर्ज स्विकृती व अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी गृह विभागाला देईल. त्यानंतर मैदानी चाचणी सुरू होईल. पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. त्यांना एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज करता येणार नाही.

पोलिस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची (मुंबई वगळून) एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. मैदानी चाचणीत मानवी हस्तक्षेप कमी असणार असून या चाचणीचे व्हिडिओ शुटिंग होणार आहे. साधारणत: डिसेंबरअखेर भरती प्रक्रिया पूर्ण करून सगळे निवडलेले नवप्रविष्ठ पोलिस शिपायांचे जानेवारीपासून प्रशिक्षण सुरू होईल, असे नियोजन गृह विभागाने केले आहे.

वयोमर्यादा संपलेल्यांना एक विशेष संधी

२०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना आगामी पोलिस भरतीसाठी एक विशेष संधी दिली जाणार आहे. ते उमेदवार देखील पोलिस भरतीसाठी अर्ज करू शकणार असल्याचे गृह विभागाच्या आदेशात नमूद आहे. दरम्यान, उमेदवारांना यंदा पोलिस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३५० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. गतवर्षी हे शुल्क एक हजार रुपये होते.

पोलिस भरतीसाठीच्या जागा

  • पदनाम रिक्त पदे

  • पोलिस शिपाई १२,३९९

  • पोलिस शिपाई चालक २३४

  • बॅण्डस्मन २५

  • सशस्त्र पोलिस शिपाई २,३९३

  • कारागृह शिपाई ५८०

  • एकूण पदे १५,६३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT