Audio Clip 
महाराष्ट्र बातम्या

Audio Clip : राजकीय वाद पेटला! माजी मंत्र्यांने दिलेल्या धमकीची ऑडियो क्लिप व्हायरल!

सकाळ डिजिटल टीम

नगर - नगरमध्ये एका माजी मंत्र्याने माजी खासदाराच्या मुलाला धमकी दिल्यामुळे आणि त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्याभरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बॅकग्राऊंडला दोन इतरही आवाज येत आहेत. हे दोन्ही आवाज नगर जिल्ह्यातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांच्या आवाजाशी मिळते जुळते असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Audio Clip news in Marathi)

क्लिप मध्ये नेमकं काय ?

माजी खासदाराच्या मुलाने संबंधित माजी मंत्र्याच्या गावातील एका विरोधकाला बळ देण्याचे काम सुरू केले. याचाच राग मनात धरून माजी मंत्र्याने थेट या माजी खासदारांच्या मुलाला धारेवर धरत जर आमच्या गावांमध्ये लक्ष घातले, व त्या कुटुंबाला बळ दिले, तर तुझ्याकडे बघून घेईल, याद राख गाठ माझ्याशी आहे, असा दम दिला. तसेच राजकारण गेले तेल लावत, आम्ही केसला काही भीत नाही, असे म्हणत चांगला दम भरला.

हेही वाचा इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

या दोघांच्या संवादाची ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यामुळे आता हे आवाज नेमके कोणत्या बड्या नेत्यांचे आहेत? यावर जोरदार चर्चा सुरू झाली असून हे धमकी मिळाले नेते सुद्धा संबंधित माजी मंत्र्याला घाबरतात की काय? असेही बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT