baramati esakal
महाराष्ट्र बातम्या

Baramati Loksabha: नवा ट्विस्ट! बारामती जिंकण्यासाठी आता भाजपचा मित्रपक्षही मैदानात

पवारांच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी भाजपचा चंग

सकाळ डिजिटल टीम

शरद पवारांच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी भाजपनं चंग बांधला आहे. बारामती जिंकण्यासाठी भाजपने मोठी ताकत लावली आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी बारामती मतदार संघाचा दौरा केला होता. बारामती मतदार संघ हा पवारांचा बालेकिल्ला आहे.

बारामती जिंकण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. एकीकडे भाजप ही जागा जिंकण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे भाजपचा मित्र पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष देखील या जागेवर दावा करत असल्याचे समजते. इंदापूरमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्यात रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी त्या बाबातचे संकेत दिले आहेत.

शेवते म्हणाले "बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव रासपच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेला महादेव जानकर यांना उमेदवारी देऊन उभं करणार आहोत. महादेव जानकरांनी २०१४ ला झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत सुप्रिया सुळे यांना तगड आव्हान दिलं होत. २०१४ च्या जानकर यांनी बारामतीतून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांची दमछाक केली होती. लाखोंच्या फरकाने विजयी होणाऱ्या सुप्रिया सुळे केवळ 70 हजार मतांनी विजयी झाल्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा बारामती लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात जानकर उतरणार आशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT