महाराष्ट्र बातम्या

Maharashtra State Fish:महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून या माशाला मिळाला दर्जा , सर्वात महागडा मासा आता राज्याचा गौरव वाढवणार

सुधीर मुनगंटीवर यांनी पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत ही घोषणा केली.

Manoj Bhalerao

Pomfret State Fish:महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून 'शेकरु', महाराष्ट्राचा राज्यपक्षी 'हरियाल' बरोबरचं आता महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून सिल्वर पापलेट ओळखला जाणार आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवर 'सिल्वर पापलेट' हा मासा राज्यमासा म्हणून घोषित केला आहे. सुधीर मुनगंटीवर यांनी पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत ही घोषणा केली.

महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून याआधी कोणत्याही माशाच्या प्रजातीला मान्यता मिळाली नव्हती, पण आता 'सिल्वर पापलेट'ला ही मान्यता मिळाली आहे. मुळात यामाशाचं नाव पॉम्फ्रेट (Pomfret) असे आहे. मात्र, स्थानिकांकडून या माशाला पापलेट या नावाने ओळखलं जातं.

मत्स व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवर म्हणाले की, "‛सिल्वर पापलेट' महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून यापुढे ओळखला जाईल अशी घोषणा आज मुंबईतील मस्त्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत करताना अतिशय आनंद झाला."(Latest Marathi News)

पापलेट संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी जवळील भागात आढळतो. श्रीमंतवर्ग पापलेट मासा खाण्याला जास्त प्राधान्य देतात. पापलेट मासा महागड्या माशांपैकी एक आहे. कारण तो कमी प्रमाणात सापडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara: देशात भाजप असताना कॉक्रोच जनता पक्षाची गरज काय? आठवले म्हणाले, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही

Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज, संवर्धनाच्या कामासाठी २३,२४ जूनला दर्शन पूर्ण बंद

Satara: महायुतीत खदखदीची चर्चा, कऱ्हाडात भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक; मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी फिरवली पाठ

INDW vs PAKW: भारताची टी-२० वर्ल्डकप मोहीम आजपासून; आज भारत-पाक आमनेसामने, कशी असेल Playing 11

पाण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी, भाजप कार्यकर्त्याची हातोड्यानं ठेचत हत्या, २ सख्खे भाऊ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT