Maharashtra Winter Session Esakal
महाराष्ट्र बातम्या

Assembly Winter Session: अजित पवारांचे पुणेरी चिमटे, "साहेब तुम्ही मंत्री झाल्यापासून.."

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार कायमच आपल्या आक्रमक, सडेतोड बोलण्यातून ओळखले जातात

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार कायमच आपल्या आक्रमक, सडेतोड बोलण्यातून ओळखले जातात. ते कायमच विरोधी नेत्यांवर आपल्या आक्रमक शैलीत कोंडीत पकडताना दिसून येतात. परंतु यावेळी त्यांची एक वेगळीच झलक दिसून आली आहे. आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी सभागृहाबाहेर अजित पवारांचं वेगळं रूप पाहायला मिळालं आहे.

अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये हजर झाले आहेत. यावेळी अजित पवार आणि सहकारमंत्री अतुल सावे समोरासमोर आले. तेव्हा अजित पवार आणि त्यांच्यातील संभाषण आजचा चर्चेचा विषय ठरत आहेत.

जेव्हा अतुल सावे आणि अजित पवार समोरासमोर आले तेव्हा अजित पवार आपल्या खास अंदाजात अतुल सावे यांना म्हणतात की, "सावे साहेब तुम्ही मंत्री झाल्यापासून तुम्ही इतके बदलला आहात की, मी देवेंद्रजींना अनेकदा सांगतो की, सावे साहेबांना सांगा इतकं तुटक तुटक नसतं राहायचं. सत्ता येत असते, सत्ता जात असते. माणसं जोडायची असतात. त्यावर अतुल सावे म्हणतात की तुम्हाला माहीत आहे माझा स्वभाव कसा आहे ते." त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर दिसून येत आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. महत्वाच्या विविध मुद्दय़ांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे, तर त्यांना सडेतोड उत्तर देण्याची सरकारची तयारी केली आहे. अशातच सभागृहाबाहेर दिसणारे हे दृश्य दिसून आले आहे. सत्ता येते अन् सत्ता जाते, माणसं जोडायची असतात असा सल्ला अजित पवार यांनी मंत्री अतुल सावेंना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT