praful patel on Ajit Pawar upset in NCP because no responsibility was given viral video  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओबद्दल प्रफुल्ल पटेलांचा मोठा खुलासा

शरद पवार यांनी दिल्लीतून भाकरी फिरवली अन्...

धनश्री ओतारी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकारी अध्यक्षपदाच्या नावाच्या घोषणा केल्यानंतर अजित पवार यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतकेच नव्हे तर नाराजीच्या चर्चेलाही उधाण आलं. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी या व्हिडीओसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. (praful patel on Ajit Pawar upset in NCP because no responsibility was given viral video)

शरद पवार यांनी दिल्लीतून भाकरी फिरवली अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड केली. महाराष्ट्राची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यांकडे दिली. यामुळे अजित पवार नाराज झाले का? ही चर्चा सुरु झाली. याचवेळी या कार्यक्रमातील अजित पवारांचा एका व्हिडीओ समोर आला. Maharashtra Politics

या व्हिडीओमध्ये अजित पवार खाली मानं घालून बाटलीसोबत खेळताना दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. या व्हिडओमुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येऊ लागले. Maharashtra Politics

दरम्यान, एका वृत्तसंस्थेशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी यावर खुलासा केला आहे. अजित पवारांचा हा व्हिडीओ शरद पवार यांच्या घोषणे नंतरचा नव्हे तर आधीचा होता. असं सांगत पटेल यांनी अजित पवार नाराज नाहीत असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. तसेच खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. Maharashtra Politics

परंतु अजित पवार यांच्यांवर सध्यातरी कोणतीही जबाबदारी दिली नाही. शरद पवार यांच्या घोषणेनंतर माध्यमांनी अजित पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार यांनी माध्यमांशी कुठलाही संवाद न साधता तेथून निघून गेले. तसेच शरद पवार यांच्या घोषणेनंतर पक्षाच्या झालेल्या बैठकीत ते नव्हते. यामुळे ते नाराज आहे का? यासंदर्भात चर्चा सुरु झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT