Praful Patel On Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Praful Patel On Sharad Pawar : गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवारांची भेट घेणार का? 'आता...'

अजित पवार यांच्यासोबत दिलीपराव वळसे पाटील, धनंजय मुंढे, आदिती तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह आणखी काही नेत्यांनी शपथ घेतली.

युगंधर ताजणे

Praful Patel On Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणानं वेगळं वळण घेतले आहे. कुणीही ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता अशी अनपेक्षित गोष्ट राज्याच्या राजकीय पटलावर घडल्याचे दिसून आले आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर अनेकांचे धाबेच दणाणले. राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आले.

अजित पवार यांच्यासोबत दिलीपराव वळसे पाटील, धनंजय मुंढे, आदिती तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह आणखी काही नेत्यांनी शपथ घेतली. त्यानंतर सोशल मीडियावर या नेत्यांविषयी तीव्र शब्दांत राग व्यक्त करण्यात आला. त्यातल्या त्यात दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी कसे काय बंडाचे निशाण फडकावले असा प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहे. पटेल हे तर पवारांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. पवारांचा राईट हँड म्हणून ज्यांची ओळख आहे त्या पटेल यांच्या शपथविधीनंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्या या निर्णयाविषयी विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी सावध भूमिका घेतली. त्यांनी थेटपणे कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. त्यामुळेच की काय पटेल यांनी घेतलेली भूमिका कोणत्या कारणामुळे घेतली असा प्रश्न त्यांना नेटकरी विचारत आहे. इंडिया टूडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, पटेल यांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंच्या भेटीला जाणार की नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

पवार हे माझे गुरु आहेत आणि मी त्यांचे आशीर्वाद यादिवसाच्या निमित्तानं नेहमीच माझ्या पाठीशी असणार आहेत. पवार हे नेहमीच माझ्यासाठी गुरुस्थानी राहिले आहेत. त्यांचे आशीर्वादही मी घेणार आहे. पटेल यांच्याकडे राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते म्हणून पाहिले गेले आहे. त्यांनी बंड करत वेगळे होणे यामागे वेगळीच भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर देखील घोटाळ्यांचा आरोप करण्यात आला आहे.

अजित पवार यांनी वेगळे चूल मांडत निर्वाणीचा इशारा दिला. त्यात भुजबळ, वळसे पाटील यांच्यासह पटेल यांची भूमिका अनेकांसाठी प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील जोरदार टीका होताना दिसत आहे. अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा त्यांना मिळालेल्या आमदारांच्या पाठींब्याच्या जोरावर घेतल्याचे पटेल यांनी म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT