Prafull Patel 
महाराष्ट्र बातम्या

Prafull Patel: विरोधीपक्षांच्या बैठकीवर प्रफुल्ल पटेलांचा हल्लाबोल; म्हणाले, मला हसू येत होतं...

यावर लोकांचा कसा विश्वास बसेल असंही पटेल यावेळी म्हणाले.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी देशातील प्रमुख विरोधीपक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. पण या बैठकीवर पटेलांनी सडकून टीका केली आहे. या बैठकीत नेमकी काय स्थिती होती ही त्यांनी कथन केली. अजितदादांच्या गटाच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं. (Prafull Patel attack on meeting of opposition parties Said I was laughing)

पटेल म्हणाले, "काही दिवसांपूर्वी साहेबांच्याबरोबर सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीत मी गेलो होतो. त्या मिटिंगमधलं जे चित्र मी पाहिलं त्यावर मला जरा हसू येतं होतं. त्या १७ पक्षामध्ये ७ पक्ष असे होते ज्यांचे खासदार एक, एक पार्टीतर अशी होती ज्याचा खासदार शून्य. असे १७ पक्ष तिथं होते आणि म्हणत होते कायतर आम्ही परिवर्तन घडवून आणणार. लोकांना यावर विश्वास बसेल का सांगा तुम्ही"

पण आम्ही आजचा निर्णय घेतला तो राज्याच्या हितासाठी घेतला, आपल्या पक्षाच्या हितासाठी घेतला आहे. आपल्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघाच्या हितासाठी निर्णय घेतला आहे. म्हणून असा महत्वाचा निर्णय सत्तेचा हव्यासापोटी घेतलेला नाही.

अजितदादांनंतर विरोधीपक्ष नेते म्हणून मंत्रीपदाचा दर्जा होता. बंगला होता, सर्व प्रोटोकॉल होता. दादांनी निर्णय स्वतःसाठी घेतलेला नाही. तुमच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे. म्हणून सर्वांनी याचं स्वागत केलं पाहिजे. आपल्या मूळ धर्मनिरपेक्षतेच्या विचारापासून आपण कधीची दूर जाणार नाही, असंही यावेळी पटेल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT