Prakash Ambedkar 
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले...

रवींद्र देशमुख

मुंबई, ता. 20 - गायरान जमीनीवरील अतिक्रमण करून घर बांधले असल्यास पाडले जाणार नाही, शेत जमीनीसाठी अतिक्रमण केले, त्यांचे पीक नष्ट् केले किंवा त्याचा लिलाव होणार नाही. एसआरए पूनर्विकास योजना येत्या दीड वर्षात योजना मार्गी सरकार मार्गी लावेल. त्यामुळे अर्धी लढाई जिंकलो आहेत, अशी ठाम ग्वाही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विविध मागण्यांवर यशस्वी चर्चा झाली असून बीडीडी चाळींच्या विषय़ावर अर्धी चर्चा झाली आहे. तो प्रश्नही आपण मार्गी लावू , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचा विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चात ते बोलत होते

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यातील गायरान जमीनी, झोपडपट्टी पूनर्विकास योजना, बीडीडी चाळीचा पूनर्विकास आदी विषयांवर विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा पालिका मुख्यालयासमोर अडविण्यात आला. यावेळी झालेल्या जाहिर विराट सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

मुंबई, नवीमुंबईसह राज्याच्या विविध भागातून या मोर्चाला मोठ्या संख्येने लोक आले होते. "गायरान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे", "गायरान जमीनी हक्क मिळालाच पाहिजे", अशा घोषणा देत पालिका मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.

गेल्या महिनाभर या मोर्चाची तयारी सुरू होती. मोर्चा विराट निघाला. यावेळी विभागवार पक्षाच्या पदाधिका-याची भाषणे झाली. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याशी विविध मागण्याची यशस्वी चर्चा झाली, अर्धी लढाई आपण जिंकलो आहोत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

गायरान जमीनीवर ज्यांनी अतिक्रण केली आहेत. त्यांचे घर पाडले जाणार नाही. त्यांची घराचे पट्टे त्यांच्या नावावर केले जातील. तालूका जिल्हा स्तरावर अर्ज तेथे भरून द्या, त्यासाठी मोर्चा काढू नका. ज्या जमीनी शेतीसाठी अतिक्रमित केल्या आहेत. त्यातील पिके नष्ट केली जाणार नाही किंवा त्यांच्या लिलाव होणार आहे. जो कसेल त्याला पिक मिळेल अर्धी लढाई आपण जिकले आहेत, असे आंबेडकर म्हणाले.

एसआरए झोपड्यांचा पूनर्विकासासाठी झोपड्यांच्या जागा खाली करून बिल्डरांच्या ताब्यात दिल्या आहेत. भाडेही बिल्डरांकडून मिळत नाही आणि जागाही नाही अशी झोपडपट्टीवासियांची परवड होते. त्यामुळे या योजना म्हाडा, सिडको आणि एमएमआरडीकडे वर्ग करा, या योजनांसाठी वर्ष दिडवर्ष लागेल. ही प्राधिकरणे भाडे देतील. बीबीडी चाळींविषयी अर्धीच चर्चा झाली आहे.पूर्ण लढाई जिंकणारच असा निर्धार आंबेडकर यांनी व्यक्त केला.

ऑन मणिपूर

मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेवर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझ्या अंदाजानुसार मणिपूरमधील ही पहिली घटना नाही. या आधीही महिलांनी तिथे अनेक मोर्चे काढलेले आहेत. शासन भाजपचे असू किंवा कोणाचेही असू, मी आधीही सांगितले, की चीन अतिक्रमण करत आहे. त्यामुळे आपण त्यांना जसे आहे तसे स्वीकारायला हवे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Road Accident : परदेशात फिरण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात नोकरी करणाऱ्या बीडच्या पूजाचा थायलंडमध्ये मृत्यू; दुचाकीवरून फिरताना अपघात

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून मोठ्या रांगा

स्पेशल चहा बंद, फक्त 'कटिंग'; गॅस टंचाईचा चहा टपऱ्यांना फटका, तर कामगारावर बेरोजगारीचं संकट

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

SCROLL FOR NEXT