Uddhav Thackeray and Prakash Ambedkar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: वंचित होणार इंडियाचा भाग ? आज समजणार आंबेडकरांची भूमिका !

सकाळ डिजिटल टीम

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हायचे आहे. आम्हाला कुणालाही तोडायचे नाही. माध्यमांतून याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. वंचितच्या नावानेही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

पूर्वीच्या काळात असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था याही काळात सरकारी यंत्रणेत राबवली जात असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी जसे चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील सर्वांत खालच्या वर्णाला, शूद्र अतिशूद्र यांना कुठलीही सामाजिक आर्थिक सुरक्षा सुरक्षितता देण्यात येत नव्हती, त्याच पद्धतीने आता सरकार वर्ग तीन आणि वर्ग चारची पदे ही कंत्राटी पद्धतीने भरून या कर्मचाऱ्यांना असुरक्षिततेत लोटत आहे.

एक प्रकारे त्यांना हीन वागणूक देण्याचा प्रकार सरकारकडून होत आहे, असा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इतकी वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची राजवट बघितली. त्यानंतर शिवसेना आणि भाजपची राजवट बघितली. आता शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी आणि भाजप यांची राजवट बघत आहेत; मात्र या धोरणात काही बदल झाल्याचे दिसून येत नाही. सध्याच्या शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने तर नऊ खासगी कंपन्या कंत्राटी भरतीसाठी नेमल्या आहेत, असे ते म्हणाले.

ग्रामसेवकपदाची ४,६४४ जागांची भरती निघाली. त्यासाठी ११ लाख ५० हजार उमेदवारांनी अर्ज भरले. प्रत्येक उमेदवाराकडून १,००० रुपये फी घेतली. यामध्ये कोणाकोणाचा किती वाटा आहे हे त्यांनी जाहीर करावे. विद्यार्थ्यांची, बेरोजगार तरुणांची ही लूट आहे. सरकारने तत्काळ ही लूट थांबवली पाहिजे, असे ही आंबेडकर म्हणाले. वंचितची सत्ता आली, तर सर्व कंत्राटी कामगारांना कायम करणार, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली.

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठविल्याच्या खोट्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवर चालविण्यात येत आहेत. अद्याप आम्हाला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निमंत्रण प्राप्त झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीबद्दल सुरू असलेला खोडसाळ प्रचार थांबवावा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT