Prakash Ambedkar on Aurangzeb grave says I am not alone who visit Aurangzeb tomb 
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar on Aurangzeb : औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली म्हणून होणारी दंगल थांबली; आंबेडकरांनी दिलं स्पष्टीकरण

रोहित कणसे

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिल्याने त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाणारा मी एकटा नाही, अजून बरेच राजकीय नेते कबरीवर गेल्याचे सांगत स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राजा म्हणून ५४ वर्ष औरंगजेबाने राज्य केलं आहे. त्याने सुफी परंपरा जपली आणि तशा त्याला चांगल्या आणि वाईट बाजू आहेत. चांगल्या बाजूचं गुणगाण गायलं पाहिजे वाईट बाजू सोडल्या पाहिजेत. मुस्लीमांना कडवटपणा हिंदूचा कडवटपणा उभं करणं चालंलं आहे ते थांबलं पाहिजे.

छत्रपती संभाजी राजांच्या हत्येबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी कुठल्याही व्यक्तीच्या जातीचा उल्लेख आजिबात करणार नाही. ती व्यक्ती म्हणून होती, औरंगजेबाकडे काही समाजातील माणसं होती आणि शिवाजी महाराजांकडेही तशी माणसं होती. माणसं ही माणसं म्हणून बघा त्याची जात म्हणून बघू नका.

मी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली आहेत. याचं कारणं जे चुकीचा समज तयार केला जातो आहे, तसेच हिंदू-मुस्लिम दंगली करण्याचा जो बेत होता, तो मला थांबवायचा होता. माझ्या त्या प्रयत्नाला यश आलं असं मी म्हणतो आणि औरंगजेबाच्या नावाने जी दंगल होणार आहे ती थांबली आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी प्रकाश आंबेडकारांनी यांनी यापूर्वी देखील बरेच राजकीय नेते औरंगजेबाच्या कबरीवर गेले आहेत असेही सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

Vilas Chavan Success Story : दगड फोडणाऱ्या हातांनी घडवला 'साहेब'; मजुराचा मुलगा बनला अधिकारी, विलास चव्हाणांची MIDC अभियंता पदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा

Konkan Holi Festival : एकमेकांच्या अंगावर फेकली जातात जळती लाकडे, होळीला रंगते देव-दानव युद्ध ! कोकणातील 'या' गावात शेकडो वर्षांची परंपरा

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

SCROLL FOR NEXT