vanchit bahujan aghadi
vanchit bahujan aghadi  
महाराष्ट्र

Prakash Ambedkar VBA Join MVA : अखेर प्रकाश आंबेडकर 'मविआ'चा भाग; जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार?

रोहित कणसे

Prakash Ambedkar VBA Join MVA : वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास अघाडीत अधिकृत स्थान देण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाला आहे. ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे २ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

तसेच वंचित मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल, असेही उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीकडून जारी करण्यात आलेलं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. आज झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष - काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांच्यात वंचितला मविआमध्ये स्थान देण्याबाबत एकमत झाल्याची माहिती या पत्रातून देण्यात आली आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

"देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते."

"ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे."

"दि. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे."

जागा वाटपाचं काय होणार?

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीत अधिकृतपणे स्थान देण्यात आले आहे. यानंतर आता महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षात जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी समाज जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला होता. यानुसार सर्व पक्षांना १२ जागा मिळणार होत्या. आता याबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT