MLA Prakash Solanke reacting strongly after Dhananjay Munde recalls walmik Karad, highlighting rising political tensions in Maharashtra.
esakal
NCP MLA Prakash Solanke Remark : परळीत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासभेत बोलताना सोमवार माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी नामोल्लेख न करता वाल्मिक कराडची जाहीरपणे आठवण काढली. यामुळे धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा जोरदार टीका टिप्पणी सुरू झाली आहे.
विरोधी पक्षांनी तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत, याचाच हा जाहीर पुरावा असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील तीव्र शब्दांत धनंजय मुंडे यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. तर मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच जाब विचारला आहे.
यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील धनंजय मुंडे यांना त्यांच्या या विधानावरून पत्रकारपरषदेत बोलताना, ‘’फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्ही आणि खंत दूर करा’’ असा टोला लगावला. ज्याची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.
खरंतर वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे आणि सध्या जेलमध्ये आहे. मात्र तरीही धनंजय मुंडे यांनी परळीत भाषणात बोलताना माझा सहकारी आज आपल्यात नाही, याची उणीव भासते, न्यायालय काय खरं काय खोटं ते तपासून पाहील, असही बोलून दाखवलं आहे.
‘’नऊ दहा महिने झाले आहेत, कार्यालय चालू आहे. काम चालू आहे. हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही, याची जाणीव पण होते. माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकाऱ्याला सहकारी समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी वाटते, काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायलय याची जाणीव नक्कीच.’’
त्यांनी जी काय खंत बोलून दाखवली. ती खंत खरंच त्यांना, मला वाटतं की प्रत्येक क्षणाला त्यांच्या पाठीमागे असणारा सावलीसारखा वाल्मिक कराड याच्याबद्दलच ती खंत असावी आणि फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्ही आणि खंत दूर करा एवढंच मी म्हणेण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.