pratap-sarnaik to cm eknath shinde over andheri east byelection bjp withdraws candidate against rutuja latke
pratap-sarnaik to cm eknath shinde over andheri east byelection bjp withdraws candidate against rutuja latke  esakal
महाराष्ट्र

Eknath Shinde: अंधेरीतून भाजपची माघार, प्रताप सरनाईकांचे CM शिंदेंना उद्देशून ट्विट; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मागच्या काही दिवसांपासून अंधेरी पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं होतं. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र शिंदे गट-भाजपचे उमेदवाराने माघार घेतली आहे. ही निवडणूक बिनविरोध करा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना केले होतं. यादरम्यान शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्राची दखल घेत विनंती केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांचे आभार मानले आहेत, त्यामुळे शिंदे गट-भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतल्याची घोषणा दुपारी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठकारे यांनी आभार मानणारे पत्र लिहित आभार मानले होते, पत्रामध्ये राज ठाकरे यांनी लिहले आहे की, काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार.

पुढे त्यांनी म्हटले की, चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार अशा शब्दात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

सरनाईक काय म्हणालेत?

काल रात्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करा अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपने निवडणुकीतून माघार घेतली, त्यानंतर सरनाईकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत, त्यांनी लिहिले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी लिहिलेल्या पत्राचा मान ठेवून तुम्ही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंधेरी येथील पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची विनंती केलीत यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार,” असे ट्विट प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तसेच “महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे जतन करणारे तुमच्यासारखे शिलेदार आहेत याचा मला अभिमान आहे,” असे सरनाईक म्हणाले आहेत.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयचा मार्ग भाजपने माघार घेतल्याने मोकळा झाला आहे. मात्र या निर्णयानंतर शिंदे गट आणि भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT