esakal

महाराष्ट्र बातम्या

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

Pratibha Dhanorkar warns : अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात, अशी खंतही धानोरकर यांनी व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

''बहुमताच्या जवळ असूनही काँग्रेसला चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. या संपूर्ण प्रकरणाचे खापर पद्धतशीरपणे माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या षडयंत्रामागे नेमके डोके कुणाचे आहे, याचा भांडाफोड लवकरच करणार.'', असा इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित तसेच पराभूत उमेदवारांच्या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन दोन दिवसांपूर्वी करण्यात आले होते. या स्नेहमिलन सोहळ्यात खासदार धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील मतभेद कायम असल्याचे दिसून आले. वडेट्टीवार समर्थकांनी या स्नेहमिलन सोहळ्याकडे पाठ फिरविली होती. तर व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, सुभाष गौर, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा ॲड. कुंदा जेणेकर, काँग्रेस शहराध्यक्ष संतोष लहामंगे, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक प्रदीप ऊर्फ पप्पू देशमुख, नगरसेवक वसंता देशमुख यांच्यासह धानोरकर समर्थक नगरसेवक उपस्थित होते.

महाराष्ट्रात पक्षाची स्थिती बिकट असताना चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखविला. मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी काही ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या पक्षांनी आणि आपल्या काही हितशत्रूंनी माझ्याविरोधात कट रचला. मला या प्रकरणात ‘व्हिलन’ ठरवण्यात आले. या प्रकरणातील सत्य लवकरच जनतेसमोर मांडणार, असे खासदार धानोरकर म्हणाल्या.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी महापौर काँग्रेसचाच हवा; बहुमताचा आकडा नसेल तर विरोधात बसा, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. पक्ष वाढवण्यासाठी नेते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात; मात्र त्यांच्या अवतीभवती असलेले काही स्वार्थी कार्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या नेत्यांविरोधात कानभरणी करून गटबाजी निर्माण करतात, हे दुर्दैवी आहे. अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय यांनी केले. जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी खासदार धानोरकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वामुळेच नगरसेवकांची संख्या १२ वरून २७ पर्यंत वाढली, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन रामकृष्ण कोंड्रा यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO PF Withdrawal : पीएफ काढणाऱ्यांसाठी खुशखबर! आता २४ तासांत मिळणार पैसे, EPFOचा मोठा निर्णय

Pune News: नोकरी नाही, घरही विकले! पिंपरीतील हृदयद्रावक घटना; पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Navi Mumbai: नवी मुंबईतील 'जलद पुनर्विकासा'ला ब्रेक? जनाधार वाढवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजपचा कायदेशीर सुरुंग

Nanded News: जनावरांचे दूधवाढीच्या नावाखाली फसवणूक, साडेचौदा लाख रुपयांचा ‘दुधारू गोल्ड’ जप्त

SCROLL FOR NEXT