Pravin Darekar Bogus Labour Case sakal media
महाराष्ट्र बातम्या

बोगस मजूर प्रकरण : दरेकरांना अटक होऊन मिळणार तत्काळ जामीन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना बोगस मजूर प्रकरणात आज अटक होणार आहे. त्यानंतर त्यांना तत्काळ जामीन देखील मिळणार आहे. या गुन्ह्यात दिलासा मिळाल्यानंतर हायकोर्टाने तसे आदेश दिले होते. त्यासाठी दरेकर पोलिस ठाण्यात जायला निघाले आहेत.

प्रवीण दरेकर यांना अटक झाल्यास तत्काळ जामिनावर सुटका करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्यामुळे दरेकर यांना अटक दाखवून त्यांच्या जामिनाची प्रक्रिया पोलिस ठाण्यातच पार पाडली जाणार आहे. ३५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन होईल. थोड्याच वेळात दरेकर हे एम आर ए मार्ग पोलिस ठाण्यात येणार आहेत. यापूर्वी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारने राजकारण करत मला अडकवले. पोलिस ठाण्यात जास्तीत जास्त जाण्याची ड्युटी सरकारने आमच्यामागे लावली आहे. मला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. फक्त कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिस ठाण्याला जात आहे, असं दरेकर म्हणाले.

मुंबई जिल्हा बँकेवर संचालक होऊन महापालिका अटींचे उल्लंघन करतात. विष्णू घुमरे यांचे महापालिकेने निलंबन केले आहे. मजूर सदस्य म्हणून माझ्यावर कारवाई केली जाते. मग विष्णू घुमरे यांच्यावरील कारवाईला इतका विलंब का झाला? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

येत्या शनिवारी होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेवरून देखील दरेकरांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाकडे वळत असतील तर स्वागत आहे. त्यांची सभा टोमणा मारणारी होऊ नये. टोमण्याशिवाय सभेत काही असेल असे मला वाटत नाही. आपला राग क्षमवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतील. असली नकली बाबत राज ठाकरे यांच्यावर कॉपी केली म्हणून टीका केली. आता राज ठाकरे यांच्या सभेची कॉपी शिवसेनेला करावी लागली. हिंदू जननायक या शब्दाचीही उद्धव ठाकरे यांनी कॉपी केली आहे. त्यांनी कॉपी करण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणावेत, असं प्रविण दरेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : बैलगाडा शर्यतीत थरार! बैलाची घोडीवरून उडी; मोठा अपघात टळला

Karjat Accident: कर्जत रस्त्यावर अपघात, सात विद्यार्थी जखमी; अकलुज येथील वॉटरपार्कला जात हाेते अन् अचानक काय घडलं!

"शाळानंतर 18 सिनेमे केले पण रिलीज झाले नाहीत" अंशुमनने व्यक्त केली खंत; म्हणाला..

कोस्टल कॉरिडॉरमुळे नकाशा बदलणार! अटल सेतू आता अलिबागकडे वळणार; नवा मार्ग कसा असणार?

Pune Crime: नारायणगाव येथे बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या तरुणास अटक, तलवारी जप्त व खंजीर जप्त..

SCROLL FOR NEXT