pravin darekar, uddhav thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई सुरु; दरेकरांचे आघाडीवर टीकास्त्र

किरीट सोमय्या पळणाऱ्यांमधले नाही, पळवून लावणाऱ्यातले; प्रवीण दरेकर

सकाळ डिजिटल टीम

तेच तेच मुद्दे पुन्हा उगाळून माहिती घेण्याचा प्रयत्न केला गेला. एफआयआरशी संबंधित अगदी त्रोटक मुद्दे असायला हवे होते. मात्र व्यक्ति केंद्रित छळवाद करण्याचा सरकारने प्रयत्न केला असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात चौकशी झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीवर (MahaVikas Aghadi) निशाणा साधताना ते म्हणाले. तासनतास बसवून येथे छळवणूक केली जाते. पोलीस (Police) यंत्रणा दबावाखाली आहे. मात्र कायदा मानणारे आम्ही लोक आहोत चौकशीला सहकार्य करणारच असेही ते म्हणाले. एक तासाच्या चौकशीसाठी तीन-तीन तास बसवले जात आहे हा छळवाद आहे. माझ्यावर सूडबुद्धीनं कारवाई केली आहे.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आज आरोप केला होता. त्याला उत्तर देताना दरेकर म्हणाले, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे पळून जाणाऱ्यातील नाहीत पळवून लावणारे आहेत असेही ते म्हणाले.

लोकशाही मानणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. संजय राऊत यांच्यासारखा आक्रस्ताळेपणा करणार नाही.

संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, लोकशाही मानणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. संजय राऊत यांच्यासारखा आक्रस्ताळेपणा करणार नाही. कायद्याला प्रतिसाद देणार असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT