Pravin Darekar Slams Nana Patole
Pravin Darekar Slams Nana Patole sakal media
महाराष्ट्र

पटोलेंमध्ये दम अन् धमक दिसत नाही; दरेकरांचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीवरून (NCP BJP Alliance in Bhandara Gondia Election) राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एवढेच नव्हे तर, राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप पटोलेंनी (Nana Patole) केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील सुरू झालेला हा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे या दोन्ही पक्षाच्या वादात आता भाजपनेदेखील याबाबत प्रतिक्रिया देत या वादात उडी घेतली आहे. नाना पटोले यांच्या कुठल्याही वक्तव्याला गांभीर्याने घेऊ नये, नानांमध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नाही, असे विधान भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केले आहे. (Pravin Darekar Slams Nana Patole)

दरेकर म्हणाले की, दम आणि धमक नानांमध्ये दिसत नाही सत्तेत मांडीला मांडी लावून बसायचे आणि काँग्रेस पक्षाने कात टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दिसतंय. जर त्याचा परिणाम राज्यात दिसत असेल, तर नानांचे वक्तव्य हायकमांड गांभीर्याने घेतील असे दरेकर म्हणाले. दरम्यान, पटोले यांनी केलेल्या आरोपाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे. तसेच या प्रकरणी पटोलेंनी काँग्रेस हायकमांडकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे.

नेमका वाद काय?

भंडारा गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकांत राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने पाठित खंजीर खुपसला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला होता. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. पण, राष्ट्रवादी नेहमी भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप पटोलेंनी केला होता. त्यानंतर अजित पवारांनी देखील पटोलेंना प्रत्युत्तर दिले होते. ''प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. जिल्हास्तरावरील निर्णय तेथील नेते घेतात. नाना पटोले कोणत्या पक्षातून आले आहेत. त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा आमच्या पाठित खंजीर खुपसला असं भाजपने म्हणावं का? नाना पटोलेंची पार्श्वभूमी माहिती आहे'', असं अजित पवार म्हणाले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक वार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT