Supriya Sule  sakal media
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्रीपद वडापाव, सँडविच देण्याएवढं सोपं नाही; सुप्रिया सुळेंना भाजपचा टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - Vedanta Foxconn Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर सारवासारव करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती दिली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच मोठी ऑफर दिली होती. त्यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. (Pravin darekar news in Marathi)

भाजपनेते प्रविण दरेकर म्हणाले की, सुप्रिया सुळे यांनी आधी शरद पवार साहेबांना आणि अजित दादा काय म्हणतात, हे पाहावं. पहिलं त्यांनी कुटुंबात आणि पक्षात एकमत करावं. तु मला मुख्यमंत्री पद दे, मी तुला देतो एवढा छोटा विषय नाही. मुख्यमंत्रीपदासाठी काय रामायण, महाभारत होतं, महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे ही काय देवाण-घेवाण नाही. तु मला वडापाव दे, मी तुला सँडविच देतो, एवढा सोपा विषय नाही, अशी खोचक टीका दरेकर यांनी सुप्रिया सुळेंवर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदांता पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिल्याची माहिती सुप्रिया सुळे यांना देण्यात आली. त्यावर सुळे म्हणाल्या होत्या की, मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना ऑफर देते की, आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ आता तुम्ही अजित दादांना मुख्यमंत्री करावं. वेदांता प्रकल्प महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अर्थकारणाचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की एकत्र येऊन केंद्र सरकारला विनंती करावी, हा प्रकल्प महाराष्ट्राला द्यावा, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान एकीकडे सामंत म्हणतात, दोन महिन्यात प्रकल्प गुजरातला जावू शकत नाही. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनातील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री स्पष्ट म्हणताना दिसतात की, वेदांता प्रकल्प लवकरच महाराष्ट्रात येत आहे. केवळ २१ दिवसांपूर्वी त्यांनी हे विधान केलं होतं. अर्थात त्यांच्या या विधानामुळे वेदांता प्रकल्प २१ दिवसांतच गुजरातला गेल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची घोषणा खरी होती की, उद्योगमंत्री सामंत खरं बोलतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून शिंदे आणि सामंत यांच्यात ताळमेळ नसल्याचं स्पष्ट होतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माजी रेल्वे मंंत्री मुकूल रॉय यांचं निधन, वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ड्रग लॉर्ड एल मँचोचा एन्काउंटर! सर्वात मोठं कार्टेल लष्करी कारवाईत उद्ध्वस्त; मेक्सिकोत उसळला हिंसाचार

Maharashtra Weather Update : राज्यावर अवकाळीचे संकट ! 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू, तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

IND vs SA: भारतीय संघाचा पराभव, पण बुमराह-अर्शदीपचे मोठे विक्रम; T20 World Cup इतिहासात ठरले सरस भारतीय गोलंदाज

Latest Marathi News Live Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT