Ajit Pawar BhagatSingh Koshyari Sakal
महाराष्ट्र बातम्या

मुर्मूंचं कौतुक करता करता अजित पवारांचा कोश्यारींना चिमटा; म्हणाले...

पुन्हा एकदा अजित पवारांची विधिमंडळात फटकेबाजी

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही ना काही कारणाने सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर सातत्याने टीका होत असते.काही दिवसांपूर्वीही मुंबईबद्दल त्यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद झाला होता. यावेळी विरोधकांकडून कोश्यारी यांच्या राजीनाम्याचीही मागणी झाली होती. आता पुन्हा एकदा अजित पवारांनी त्यांना टोला लगावला आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दोघांचंही अभिनंदन केलं. तसंच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही दोघांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलाच चिमटा काढला आहे.

द्रौपदी मुर्मू झारखंडच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या या कामाबद्दल त्यांचं कौतुक करताना अजित पवार म्हणाले की, बाकीच्या राज्यपालांबद्दल राजकीय होत असताना मुर्मू मात्र लोकप्रिय होत्या. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही त्यांचं कौतुक करायचे. अजित पवारांच्या निमित्ताने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या राज्यपालांचा विषय पुन्हा एकदा वर आलाय.

यापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अत्यंत वादग्रस्त विधान केलं होतं. सोबत मुंबईतून गुजराती, राजस्थानी लोक गेले, तर ती आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. यामुळे सातत्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी लावून धरली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था वेगाने धावणार! २०२६-२०२७ मध्ये GDP वाढ ७ टक्के राहण्याचा IMFचा अंदाज

CJP Protest : काँग्रेसच्या मोर्चात सीजेपीचे कार्यकर्ते का दिसले नाहीत? आशुतोष रांकाने सांगितले 'हे' कारण

Megablock: कसारा ब्लॉकचा लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका, १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान लोकल सेवा बंद

Latest Marathi News Live Update : सोयाबीनच्या दरात तब्बल ३०० रुपयांची घसरण; एकाच दिवसात ४० लाखांचे नुकसान!

Cricket News: महाराष्ट्राच्या संघाला ३३३ धावांवर रोखले; रणजी क्रिकेट करंडक ;सेनादलच्या एक बाद ७४ धावा

SCROLL FOR NEXT