Draupadi Murmu on Mumbai tour today 
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू आज मुंबईत; पण उद्धव ठाकरेंना भेटणार नाहीत!

राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक बदल झाले आहेत. अशातच देशातील राजकारणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. (Draupadi Murmu on Mumbai tour today)

राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुबंईत येणार असून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांसोबत त्यांची बैठक होणार आहे. शिवेसेनेनं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, याआधी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट घेतली आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू याही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार का हे पहावे लागणार आहे. कारण आज त्या मुंबई दौऱ्यावर असल्या तरी ठाकरेंशी त्यांच्या कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर असून त्या तीनच्या सुमारास विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर पाचनंतर त्या पुन्हा दिल्लीकडे होणार आहेत. त्यामुळे या कालावधीत मुर्मू मातोश्रीवर जाणार का हे पहावं लागणार आहे. दोन ते अडीच तासांचा या कालावधीत मुर्मू जाणार का नाही असे सवालही राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांसोबत प्रचाराचे एक भाषण करुन त्या पुन्हा दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT