narendra modi 
महाराष्ट्र बातम्या

शिवाजी महाराज नसते तर... कल्पनाही करवत नाही- पंतप्रधान मोदी

कार्तिक पुजारी

बाबासाहेब पुरंदरे १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यावेळी त्यांच्या सत्कारासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थिती लावत बाबासाहेब पुरंदरेंना शुभेच्छा दिल्या

पुणे- बाबासाहेब पुरंदरे १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यावेळी त्यांच्या सत्कारासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थिती लावत बाबासाहेब पुरंदरेंना शुभेच्छा दिल्या. शिवाजी महाराजांचा इतिहास जनतेसमोर पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेलं काम अतुलनीय असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष असल्याचं ते म्हणाले.

"छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेत. महाराज नसते तर भारताची अवस्था काय असती? याची कल्पना करवत नाही. शिवाजी महाराजांचे स्वराज्य सर्वांनाच अनुकरणीय आहे. आपला भविष्य, वर्तमान, भूतकाळ महाराजांनी प्रेरित आहे. शिवाजी महाराज नसते कर काय झालं असतं? शिवाजी महाराजांशिवाय भारताच्या गौरवाची कल्पना करणे अवघड आहे. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज, नौसेनेचा वापर, जलप्रबंध, अत्याचाराला विरोध प्रशासनाचे अप्रतिम उदाहरण आहे, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून बाबासाहेब पुरंदरेंना शुभेच्छा दिल्या. २०१९ मध्ये देशाने बाबासाहेबांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. २०१५ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण दिले, मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह चौहान सरकारने त्यांना कालिदास पुरस्कार दिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांच्या मनात इतकी भक्ती उगाच नाही. त्यांचे जीवन अनुकरणीय असे आहे, असं मोदी म्हणाले.

बाबासाहेबांनी आझाद भारताच्या पिढीला महाराजांच्या रुपाची ओळख करुन दिली. त्यांचे लेखन आणि पुस्तकातून शिवाजी महाराजांची अतूट श्रद्धा दिसते. महाराजांच्या कथा सांगण्याची त्यांची शैली आणि शब्द अतुलनीय आहे. आपल्या कथांमधून ते महाराज कालीन प्रसंग जीवंत करतात. चार दशकांपूर्वी बाबासाहेब पुरंदरेंचे कार्यक्रम अहमदाबादमध्ये आयोजित केले जात होते. त्यावेळी मी तिथे उपस्थित राहायचो. जाणता राजाच्या प्रारंभिक काळात ते पाहण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. त्यांनी इतिहास प्रेरणेसह पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. खरा इतिहास पोहोचवण्याची गरज आहे. ते काम बाबासाहेब पार पाडत आहेत, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT