महाराष्ट्र बातम्या

पवार-मोदी भेटीमुळे काँग्रेस बॅकफूटवर; नव्या समीकरणाची चर्चा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पक्षवाढीच्या भूमिकेतून मित्रपक्षांवर कुरघोडी करून काँग्रेसने राजकीय माहोल तयार केला खरा; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन राजकीय खळबळ उडवून दिली. परिणामी, महाविकास आघाडीतील मित्रांच्या माहोल, खळबळीने ते एकमेकांना आव्हान देत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या भूमिकांची चर्चा वाढतानाच पवार यांच्या भेटीगाठींच्या खेळीने काँग्रेस 'बॅकफूट'वर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेस नेत्यांच्या, प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या रोजच्या भूमिका, विधाने आणि इशाऱ्यांमुळे गेल्या काही दिवस काँग्रेसच्या गोटात उत्साह असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना बोलावून काँग्रेसच्या मनात नेमके काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पवार यांनी केल्याचे पुढे आले. त्यानंतर मात्र, पवार यांनी लगेचच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. त्याआधी फडणवीस हे पवार यांच्यात चर्चा झाली आणि दिल्लीत पंतप्रधान मोदी, पवार यांच्यात जवळपास तासभराचे गुफ्तगु झाल्याची चर्चा आहे.

या भेटीगाठी पाहता नव्या राजकीय समीकरण जुळली जातील, याचा अंदाज बांधला जात आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता, मोदी, पवार आणि पवार आणि अन्य भाजप नेत्यांच्या भेटींचा कॉंग्रेस नेत्यांनी अद्याप कोणताही अर्थ जाहीर केला नाही. एकूणच पवार यांच्या पवित्र्यापुढे काँग्रेस थोडी का होईना पण झुकेल, असे सांगण्यात आले. म्हणजे, गेल्या काही दिवसांतील पक्षविस्ताराची भाषा, त्यातून पुढे आलेले स्वबळ, मित्रपक्षांवर ठपका ठेवताना केलेला पाळत ठेवण्याचा आरोप, यापासून काँग्रेस बॅकफूटवर येईल, असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रात काँग्रेस वाढण्याचे संकेत दाखविले जात असले तरी शिवसेना, राष्ट्रवादीसोबत सत्तेत राहावेच लागेल. या दोन पक्षांना समजून घ्यावे. ज्यामुळे विरोधकांना नवे कोलीत मिळणार नाही. असे सूचक विधानही काँग्रेसच्या या नेत्याने केले आणि काँग्रेसला भूमिका घेताना आघाडीचा विचार करावा लागेल, हेही या नेत्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

SCROLL FOR NEXT