prison  sakal
महाराष्ट्र बातम्या

Prisoner : कैद्यांसाठी मोठी बातमी! आता तुरुंगात मिळणार 'या' सुविधा

तुरुंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Prisoner : तुरुंगातील कैद्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तुरूंगात देण्यात येणारी ही सेवा पन्नस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ कैद्यांना दिली जाणार आहे.

आत्तापर्यंत तुरुंगात कैद्यांना झोपण्यासाठी ताडपत्री किंवा चादर दिली जात होती. मात्र, आता या परंपरेत बदल करण्यात आला असून, आता कैद्यांना उशी आणि बेड दिला जाणार आहे.

या निर्णयानुसार आता तुरूंगातील कैद्यांना उशी आणि बेड वापरण्यास मिळणार आहे. जेल प्रशासनाचे अॅडिशनल डीजी अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली.

का घेण्यात आला निर्णय?

अमिताभ गुप्ता यांनी तुरुंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती, या बैठकीत काही कैदी हे विविध आजारांनी त्रस्त असल्याची माहिती देण्यात आली. आजारपणामुळे हे कैदी नीट झोपू शकत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर, ५० वर्षापैक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांना उशी आणि बेड वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय देण्यात आला आहे.

परंतु, ही सर्व साधने कैद्यांना स्व-खर्चाने आणायची आहेत. यासाठी उशी आणि बेडची साईजही निश्चित करण्यात आली आहे. राज्यात तुरूंगात सध्या वायाची पन्नाशी ओलांडलेल्या कैद्यांची संख्या जवळपास ३ ते ४ हजार एवढी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आता चौपाटीवर छठ पूजा साजरी होणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; नेमके प्रकरण काय?

IPL 2027 Trade : ठरलं तर मग! अर्शदीप सिंग Mumbai Indians च्या ताफ्यात; यशस्वी जैस्वालसाठी सरप्राईज ट्रेड, कोणत्या संघाकडून खेळणार?

माधुरीच्या गाण्यातले शब्द चालतात मग माझ्या का नाही? वर्षा उसगावकरांचा 'चोली के पीछे' गाण्यावर थेट सवाल, किस्सा सांगत म्हणाल्या-

Latest Marathi News Live Update: शासन नियुक्त संचालक पोलीस बंदोबस्तात गोकुळ दूधसंघात दाखल

Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू ;आई-वडिलांसोबत धान कापणी करताना काळाचा घाला; वर्षभरातील तिसरी घटना

SCROLL FOR NEXT