pritam munde and ramdas athawale 
महाराष्ट्र बातम्या

..अन् देवदूत ठरले आमच्यासाठी...; प्रीतम मुंडेंनी आठवलेंसमोर सादर केली त्यांच्याच स्टाईलने कविता

रवींद्र देशमुख

बीड - केंद्रीयमंत्री रामदास आठवले आपल्या कवितांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात परिचीत आहेत. मात्र खासदार प्रीतम मुंडे यांनी आज आठवले यांच्याच स्टाईलमध्ये कविता म्हणून दाखवली. बीड येथे आयोजित कार्यक्रमात प्रीतम मुंडे यांनी ही कविता म्हणून दाखवली.

प्रीतम मुंडे यांनी बीड येथील दिव्यांगांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात रामदास आठवले यांच्यावर कविता केली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थित होती. प्रीतम मुंडे म्हणाल्या दिव्यांगांना केलेली ही मदत म्हणजे फार काही मोठी नाही. परंतु त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न आहे.

या मदतीसाठी मंत्री रामदास आठवले यांनी मोठे सहकार्य केले. यामुळेच बीडमधील दिव्यांगांना हे साहित्य मिळू शकले असे खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या आहे. प्रीतम मुंडे यांनी केलेली कविता,

"दिव्यांगांनी आयुष्य मोठ्या संघर्षाने वठवलं

मोदीजींनी त्यांच्यासाठी सन्मानाचं जीवन पाठवलं

हे चित्र बीडकरांनी आपल्या मनात साठवलं,

आणि देवदूत ठरले आमचे रामदास आठवले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT