Prithviraj Chavan vs Narendra Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election : 'सर्व पक्ष एक झाले तर मोदींचा पराभव निश्चित होईल'; महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

भाजपने इतकी धास्ती घेतली की त्यांनी देशाचे नावच भारत करण्याचा विचार सुरू केला.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ५० टक्केपेक्षा जास्त लोकांनी भाजपविरोधात मतदान केले.

वडणगे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकशाहीचा पाया असणाऱ्या स्वायत्त संस्था काबीज केल्या. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. भाजप विरोधातील सर्व पक्ष एक झाले तर मोदींचा पराभव निश्चित होईल, असं स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केलं.

लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून, या निवडणुकीला भाजपविरुद्ध इंडिया आघाडी उमेदवार अशाच पद्धतीने सामोरे गेले पाहिजेत,’ असे प्रतिपादनही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काँग्रेसच्या (Congress) जनसंवाद पदयात्रेच्या अंतर्गत वडणगे (ता. करवीर) येथे झालेल्या संवाद सभेमध्ये ते बोलत होते.

प्रयाग चिखली येथून संध्याकाळी ५ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. वडणगेत यात्रेचा समारोप झाला. माजी जिल्हा परिषद सदस्य बी. एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘देशाची स्थिती आराजकतेकडे निघाली आहे. कर्जाचा बोजा वाढत आहे. देशामध्ये धार्मिक आणि जातीय तेढ मुद्दाम वाढवली जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला तर पुढील विधानसभा निवडणुकही होणार नाही. देशात हुकूमशाही येईल.

Congress jansamvad padyatra Vadange kolhapur

चव्हाण पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशात वातावरण असून, काँग्रेसवर सामान्य माणसाचा विश्वास आहे. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ५० टक्केपेक्षा जास्त लोकांनी भाजपविरोधात मतदान केले, मात्र ही मते विखुरल्याने ३० टक्के मते घेणारे मोदी सत्तेत आले, असे होऊ नये म्हणूनच २८ पक्षांची मोट बांधून इंडिया आघाडी बनवली. याची भाजपने इतकी धास्ती घेतली की त्यांनी देशाचे नावच भारत करण्याचा विचार सुरू केला. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे हे एकच लक्ष्य ठेवले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘भाजपने देशाचा इतिहास पुसण्याचे काम केले. देशात ७० वर्षांत काहीच झाले नाही, असे भाजप भासवत आहे. काँग्रेसनेच देशाला उभे केले आहे.’ आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘उद्योगपतींचे १२ लाख कोटी कर्जे माफ केली जातात, पण शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानही वेळेत मिळत नाही. देशात दंगे भडकवण्याचे प्रयत्न सत्ताधिशांचे सुरू आहेत. तरुणांनी सावध राहून लोकांच्या प्रश्नावर मतदारांना विचार करायला लावले पाहिजे.’

गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगुले, बाजारसमिती सभापती भारत पाटील-भुयेकर, शंकर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ॲड. सुरेश कुऱ्हाडे, बाजीराव खाडे, महादेव नरके, सचिन चौगुले, पैलवान संभाजी पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BEST Election Results : बेस्ट पतपेढी निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव, मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे बंधुंना मोठा धक्का

Mumbai Rain Update: मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार, लोकल सेवेचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द, चाकरमान्यांचे हाल

Shivaji Maharaj : काय होता शिवरायांचा संतुलित आहार? युद्धासाठी नेहमी तंदुरुस्त राहण्यामागचं खरं रहस्य! आजच्या पिढीसाठी प्रेरणा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्याला झटपट बनवा चवदार ज्वारीची उकडपेंडी, सोपी आहे रेसिपी

MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'

SCROLL FOR NEXT