Chandrakant patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrakant Patil : खासगी विद्यापीठांतील १० टक्के आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क माफ

‘राज्यातील खासगी विद्यापीठांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १० टक्के विद्यार्थ्यांना आता यापुढे ५० टक्के शुल्क माफ केले जाईल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘राज्यातील खासगी विद्यापीठांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १० टक्के विद्यार्थ्यांना आता यापुढे ५० टक्के शुल्क माफ केले जाईल. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे आगामी काळात हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही खासगी विद्यापीठांमध्ये शिकण्याचे स्वप्न साकारता येणार आहे.

पुण्यात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘राज्यातील खासगी विद्यापीठांसंदर्भात कायदा आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला.

परंतु, एकीकडे परदेशी विद्यापीठांच्या स्वागतासाठी आपण उभे असताना राज्यातील विद्यापीठांवर बंधने घालायला नको, अशी भूमिका सरकारने घेतली. त्यामुळे खासगी विद्यापीठांसंदर्भातील कायदा आणण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर राज्य सरकार नियंत्रण आणणार नाही. परंतु या विद्यापीठांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १० टक्के विद्यार्थ्यांना ५० टक्केच शुल्क लागू केले जाईल.’

स्वायत्त महाविद्यालयांच्या बेड्या तुटणार

स्वायत्त महाविद्यालयांच्या पायात असणाऱ्या बेड्या यावर्षीपासून तुटणार आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन त्यांना यासंदर्भात अतिशय कडक समज दिली आहे. विद्यापीठांच्या स्वायत्ततेच्या विरोधात सरकार नाही.

परंतु म्हणून विद्यापीठे काहीही करतील, तर ते चालणार नाही. आवश्यकता भासल्यास विद्यापीठ कायद्यात छोटे बदल करण्यात येतील. स्वायत्त महाविद्यालयांना नवे अभ्यासक्रम सुरू करताना विद्यापीठामार्फत बंधने घालण्यात येत असतील, तर ते चालणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राज्यात पदव्युत्तर शिक्षण देणारी एक हजार २५० महाविद्यालये, ८७ स्वायत्त महाविद्यालये, ५० अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रविद्यानिकेतन आणि सर्व विद्यापीठे अशी जवळपास दीड हजार ठिकाणी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होत आहे.

यामध्ये सर्व विद्यापीठांनी धोरणाच्या अंमलबजावणीचा आराखडा सप्टेंबरपर्यंत मांडायचा आहे. डिसेंबरच्या शेवटी हा आराखडा अंतिम करायचा असून पुढील वर्षी जानेवारी २०२४ पासून पाच हजार महाविद्यालयांना यानुसार अंमलबजावणी करावी लागेल.

- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT