Solapur Lok Sabha Esakal
महाराष्ट्र बातम्या

Solapur Lok Sabha: प्रणिती शिंदेंच्या नावे 'इतक्या' कोटींची मालमत्ता; ५ वर्षांत मालमत्तेत १.८१ कोटींची वाढ

Solapur Lok Sabha: महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सध्या सहा कोटी ६० लाख ७० हजार ४०२ रुपयांची मालमत्ता आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सध्या सहा कोटी ६० लाख ७० हजार ४०२ रुपयांची मालमत्ता आहे. २०१९च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत पाच वर्षांत एक कोटी ८१ लाख ४२ हजार १९२ रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावे २०१९ मध्ये चार कोटी ७९ लाख २७ हजार २१० रुपयांची मालमत्ता होती. तर २०२४ मध्ये त्यांच्या नावे सहा कोटी ६० लाख ७० हजार ४०२ रुपयांची मालमत्ता तथा संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते.

विशेष बाब म्हणजे आपल्या नावे एकही दुचाकी, चारचाकी नसल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले आहे. २०१९च्या तुलनेत त्यांची बॅंकांमधील ठेवी तथा रक्कम जवळपास ३० लाख रुपयांनी कमी झाली आहे. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावे कोणत्याही बॅंकेचे कर्ज नसल्याचे दिसून येते.

२०१९च्या तुलनेत संपत्तीत वाढ किती?

स्थावर मालमत्तेत एक कोटी ५२ हजार ५४४ रुपयांची वाढ

जंगम मालमत्तेत २९ लाख ३५ हजार ६४८ रुपयांची वाढ

जागा, जमीन व दागिन्यांमध्ये कोणतीही वाढ नाही

पाच वर्षांत दागिन्यांत कोणतीही वाढ नाही, ३०० ग्रॅम सोने जैसे थे

बॅंकांमधील ठेवीत ३० लाखांची घट

२०१९च्या तुलनेत २०२४मध्ये एक कोटी ८१ लाख ४३ हजार १९२ रुपयांनी संपत्ती वाढली

प्रणिती शिंदेंकडील संपत्ती

दागिने : ३०० ग्रॅम

जमीन : ५ एकर ७० गुंठे

शेअरमधील गुंतवणूक : जवळपास १२ लाख रु.

बॅंका व टपालमधील ठेवी : ९९.५१ लाख रुपये

वाहने व वैयक्तिक कर्ज : नाही

निवासस्थाने : दादर व सोलापूर (प्रत्येकी एक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US airstrikes on ISIS : अमेरिकेचा सिरियातील ISISI च्या ठिकाणांवर हल्ला, VIDEO समोर...

PM Vishwakarma Yojana : सरकारी योजनेत व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण अन् स्वस्तात कर्ज मिळवण्याची संधी, कोणाला मिळेल लाभ? जाणून घ्या

Panchang 11 January 2026: आजच्या दिवशी सूर्यकवच स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

900 दरवाजे आणि 800 खिडक्या, आजपासून बिग बॉस घरात स्पर्धकांचा खेळ रंगणार, पंख असलेली कुलूप, लपलेल्या चाव्या आणि बरच काही

Youth Killed Accident : धक्कादायक! कोल्हापूरचे चार तरूण रत्नागिरीला फिरायला गेले अन्,झाला भीषण अपघात; एकजण जागीच ठार तर तीनजण गंभीर

SCROLL FOR NEXT