Mns chief raj thackeray Twitter
महाराष्ट्र बातम्या

मदतकार्य महत्वाचं, तिथे जाऊन पाहण्यात अर्थ नाही, पूरस्थितीवर राज ठाकरेंचं भाष्य

"वसत्या नुसत्या वाढत आहेत. त्याला आकार-ऊकार नाही. आकार-ऊकार द्यावा, असं कुठल्याही सरकारला वाटत नाही"

वैदेही काणेकर

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) आज ठाण्यात आले होते. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. काही महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या (election) दृष्टीने ही महत्त्वाची बैठक होती. राज ठाकरेंनी या बैठकीत निवडणूक आणि संघटना बांधणीच्या दृष्टीने सूचना केल्या. पुन्हा १५-२० दिवसांनी ठाण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Provide help relief material to people is important not to go & observe there situation raj thackeray dmp82)

राज्यातील उदभवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या मदतकार्याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "प्रत्येकजण आपआपल्यापरिने मदतीचे काम करतोय. मी, ज्यावेळी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केलं, त्यावेळी कोकणातल्या प्रत्येक गावात महाराष्ट्र सैनिक पोहोचला. सध्याच्याघडीला मदतकार्य महत्वाचं आहे. तिथे जाऊन पाहण्यात अर्थ नाही. मदत पोहोचले तेवढं चांगलं आहे"

"पूरस्थिती उदभवते, त्याचं एकमेव कारण म्हणजे, कोणत्याही गोष्टीचं नियोजन नाही. पहिल्यांदा असं घडलेलं नाही. दोनवर्षा आधी असचं झालं होतं. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. वसत्या नुसत्या वाढत आहेत. त्याला आकार-ऊकार नाही. आकार-ऊकार द्यावा, असं कुठल्याही सरकारला वाटत नाही" असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

"ठाण्याची परिस्थिती पाहिली तर, ठाणे टुमदार शहर होतं, आज काय स्थिती झाली? कोणात्याही शहराकडे लक्ष द्यायला कुठल्याही सरकारला वेळ नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उदभवणार. या थांबणाऱ्या गोष्टी नाहीत" असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Market Yard Traffic Advisory : बाबा आढाव यांच्या अंत्यदर्शनामुळे मार्केटयार्डात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्पुरते मार्ग बदल!

‘महाडीबीटी’वरील शेतकऱ्यांच्या अर्जांची पूर्वसंमती बंद! ट्रॅक्टरसह सगळ्याच यंत्रांची थांबली खरेदी; निधीची गरज ३१,८३२ कोटींची अन्‌ आहेत अवघे ११८९ कोटी रुपये

Baba Adhav refused Maharashtra Bhushan honour :...म्हणून बाबा आढाव यांनी नाकारला होता राज्याचा सर्वोच्च सन्मान, ‘महाराष्ट्र भूषण’!

अविश्रांत चळवळ! अखेरपर्यंत श्रमिकांसाठी लढत राहिले, सहा वर्षांपासून 'या' दुर्धर आजाराशी दिला लढा

Pune Airport Road Crash : मद्यधुंद चालकाची बेफाम गाडी; एअरपोर्ट रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT