Amruta Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadnavis : मी भजन जरी केलं तरी... अमृता फडणवीस ट्रोलर्सबद्दल काय म्हणाल्या?

सकाळ डिजिटल टीम

पुणेः अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं आलं आणि नेटकऱ्यांची एकच झुंबड उडाली. या गाण्याने व्ह्यूव्हजचा विक्रम प्रस्थापित केलेला असला तरी सोशल मीडियातून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

अमृता फडणवीस कार्यक्रमानिमित्त पुण्यात होत्या. त्यांना त्यांच्या नवीन गाण्याबद्दल विचारलं असता त्यांनी सर्वांना हे गाणं भरभरुन आवडल्याचं सांगितलं. ट्रोलर्सशी संबंधित प्रश्नावरही त्यांनी चपखल उत्तर दिलेलं आहे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

मी भजन जरी म्हटलं तरी लोक मला ट्रोल करतील, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. शिवाय पती देवेंद्र फडणवीस यांना हे गाणं आवडल्याचं त्यांनी नमूद केलं.

अमृता फडणवीस यांचं नुकत्याच रिलीज झालेल्या 'मूड बना लिया' या गाण्याला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. तर काही जण ट्रोल देखील करत आहेत.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, मला खूप आनंद होतोय. लोकांना गाणं आवडलं, स्वीकारलं त्याचे रिल्स होत आहेत. माझा विश्वास आहे. कोणीही काही बोलले तरी काम करत राहिले.  ट्रोल होण्याची सवय झाली मला, त्याने मला फरक पडत नाही अशा शब्दात ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

गाण्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अमृता फडणवीस यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना गाणं कसं वाटलं याबद्दलही माहिती दिली आहे. देवेंद्र गाणं चांगलं आहे असं म्हणाले असं त्या म्हणाल्या . तसेच मला पंजाबी गाणं आवडलं म्हणून ते गाणं केलं असल्याचंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT