Pune Bypoll Election  
महाराष्ट्र बातम्या

Pune Bypoll Election : दिग्गज नेत्यांच्या उपस्थित पुण्यात प्रचाराची रणधुमाळी

२६ फेब्रुवारीला या दोन्ही जागेसाठी मतदान पार पडणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune Bypoll Election मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधानामुळे कसबा आणि चिंचवड येथील विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहे. त्यामुळे या मतदासंघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाने आपले उमेदवारी जाहीर केले असून, २६ फेब्रुवारीला या दोन्ही जागेसाठी मतदान पार पडणार आहे. तर आज दिग्गज नेत्यांच्या उपस्थित पुण्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे देखील आज पुण्यात प्रचारासाठी येणार आहेत.

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती दर्शवली आहे. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात नारळ फोडून हेमंत रासने यांच्या प्रचाराला सुरुवात केलीय.

कॉंग्रेसचे कसबा पेठ मतदारसंघातील उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे आज उपस्थितीत राहणार आहेत. तसेच कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यावेळी हजर राहणार आहेत. पुण्याची ग्रमादेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरीला नमस्कार करुन साडेनऊ वाजता धंगेकरांच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे.

चिंचवडमध्ये अजित पवार

चिंचवडचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रसारासाठी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेत विरोधी पक्षनेते अजित पवार दुपारी एक वाजता सहभागी होणार आहेत. पोटविनवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकास आघाडीनं चांगलीच कंबर कसली आहे.

भाजप आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपकडून चिंचवडमधून अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी निवडणूक लढवत आहेत.

तर कसब्यातून भाजपकडून हेमंत रासने निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे निवडणूक लढवत आहेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT