Sharad Mohol Attacked esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Mohol Attacked : कोथरुडमध्ये 'मुळशी पॅटर्न', गुंड शरद मोहोळवर गोळीबार, कोणी केला हल्ला?

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील सुतारदरा परिसरात घडली.

संतोष कानडे

पुणेः कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील सुतारदरा परिसरात घडली. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

(Sharad Mohol injured after being shot by 3-4 unidentified persons)

शरद हिरामण मोहोळ (वय ४०, रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे) Sharad Mohol याच्यावर दुचाकीवर आलेल्या तीन ते चार जणांनी पिस्तुलातून गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी शरद मोहोळला लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मोहोळला कोथरूड येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

mohol Attacked pune crime news

हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली. मोहोळ याच्याविरूध्द शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

marathi crime news

कोण आहे गँगस्टर शरद मोहोळ?

शरद मोहोळ हा पुण्यातील एक गुंड आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अपहरण, खंडणी, खूनाचा प्रयत्न आणि खुनासारखे गुन्हे मोहोळच्या विरोधात दाखल आहेत. पिंटू मारणे खून प्रकरणात शरद मोहोळला अटक झाली होती. येरवडा कारागृहामध्ये त्याने सिद्दीकी नामक इसमाचा खून केला होता. मात्र पुराअभावी त्याची मुक्तता झाली होती.
Who is Sharad Mohol?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता आव्हान शहरी नक्षलवादाचं, ६१ माओवाद्यांच्या आत्मसमर्पणावेळी फडणवीसांचं विधान

Mumbai High Court: राज्यात आमदार-खासदारांवर ३९८ खटले, लवकर निकाली काढा; हायकोर्टाचे विशेष न्यायालयांना आदेश

Latest Marathi News Live Update : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबतची बैठक संपली

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली अन् इथे स्टार ऑल राऊंडरला दुखापत झाली; महत्त्वाच्या सामन्याला मुकणार...

Nilesh Ghaiwal: घायवळ टोळीच्या अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश? पुणे पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर

SCROLL FOR NEXT