Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यात थंडीची चाहूल; पारा १३.६ अंशांवर, चार दिवसांत हुडहुडी आणखी वाढणार

राज्यात किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहुल लागली आहे. विदर्भात गारठा जाणवत असला, तरी किमान तापमानात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहुल लागली आहे. विदर्भात गारठा जाणवत असला, तरी किमान तापमानात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आग्नेय अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

राज्याच्या काही भागांत उन्हाचा चटका अनुभवायला मिळत असून, ढगाळ हवामानासह उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या किमान तापमानातील वाढ-घट कायम राहण्याचे संकेत आहेत. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे १३.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

पुणे शहर परिसरातही गारठा वाढला

डिसेंबर म्हणजे पुणे शहर आणि परिसरात कडाक्याची थंडी पडत असते, यावर्षी अद्यापही थंडी वाढलेली नाही. सातत्याने किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले गेले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवेतील गारठा वाढला आहे. त्यामुळे पुण्यात यंदाच्या डिसेंबरमधील आत्तापर्यंतच्या सर्वात कमी तापमानाची नोंद काल (बुधवारी) झाली. १५ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाचा पारा खाली उतरल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

पुण्यात डिसेंबरच्या सुरुवातीलाच किमान तापमानाचा पारा १६.९ अंश सेल्सिअस नोंदला गेला होता. त्यावेळी आकाश ढगाळ होते. आता आकाश निरभ्र असल्याने हवेतील गारठा वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने किमान तापमानाचा पारा उतरत आहे. बुधवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नीचांकी तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे या महिन्यातील आतापर्यंतचे सर्वांत कमी किमान तापमान ठरले आहे. उत्तर भारतात थंडी वाढत आहे.

त्यामुळे तेथून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पुण्यातील थंडी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT