Sambhaji Bhide sakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide : अरबी समुद्रातील शिवस्मारकावरुन संभाजी भिडेंची तिखट प्रतिक्रिया; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

पुणेः अरबी समुद्रात होऊ घातलेल्या शिवस्मारकाबद्दल संभाजी भिडे यांनी आज कडक प्रतिक्रिया दिली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन समुद्रामध्ये स्मारक करण्याचा बेशरमपणा करु नये, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.

जुन्नर येथे आयोजित गडकोट मोहिमेच्या सांगता समारंभावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे बोलत होते. भिडे म्हणाले की, आपल्याकडे आधीच खूप पुतळे आहेत. त्यात आणखी अरबी समुद्रात महाराजांचा पुतळा उभा करु बेशरमपणा करु नये.

'राज्यात सरकारं उलथी-पालथी होत आहेत. तो त्यांचा धंदा असला तरी दोन्हीही आपलेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपण पुढे जात राहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं फक्त सोहळे करुन चालणार नाही. तर त्यांना होकायंत्र समजून चाललं पाहिजे' असं संभाजी भिडे म्हणाले.

हेही वाचा: Ajit Pawar : CM शिंदेंमुळे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? अजित पवार यांची धावाधाव सुरु

मागील अनेक वर्षांपासून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासह शिवस्मारकाच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. या प्रकल्पासाठी अद्यापही निविदा निघालेली नाही. मात्र या स्मारकाची गरज काय? अशी भूमिका संभाजी भिडे यांनी मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT