Pune News esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune News : पोहण्यासाठी गेलेला तरुण खडकवासला कालव्यात बुडाला; महिन्याभरात तिसरी घटना घडल्याने खळबळ

निलेश बोरुडे

किरकटवाडी : खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला यशवंत विद्यालयाजवळ कालव्यात‌ पोहण्यासाठी गेलेला एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. महिन्याभरातली ही तिसरी घटना असल्याने खळबळ उडाली आहे. सदरील तरुणाचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत.

राहुल भगवान येवले (वय 23, रा. सिंहगड कॅम्पस, पुणे, मूळ रा. बहिरवाडी, ता. नेवासा, अहमदनगर) असं बुडालेल्या तरुणाचे नाव असून महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.

राहुल व त्याच्या खोलीत राहणारे इतर पाच सहकारी सुट्टी असल्याने कालव्यात पोहण्यासाठी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला यशवंत विद्यालयाजवळ आले होते. राहुल व आणखी एकाला पोहता येत नव्हते त्यामुळे ते कडेला थांबले होते. इतर चार सहकारी कालव्यात पोहत होते.

अचानक राहुलने कपडे काढले व तो पाण्यात उतरला असता त्याचा तोल गेला व पाण्यात बुडू लागला. दूर अंतरावर पोहत असलेले इतर सहकारी ओरडत आले परंतु तोपर्यंत राहुल दिसेनासा झाला होता.

याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय पाटसकर, पोलीस नाईक राजेंद्र मुंढे, कॉन्स्टेबल मकसुद सय्यद हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिस हवालदार विलास प्रधान यांनी माहिती दिल्यानंतर पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोन्याबापू नांगरे,पंकज माळी, योगेश मायनाळे, सनी मिरगुंडे, सुरज माने हे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून कालव्यात शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT