Jayant Patil  Esakal
महाराष्ट्र बातम्या

पवार साहेबांनी सुद्धा...पुणे लोकसभा पोटनिवडणूकीवर जयंत पाटलांनी सोडलं मौन

बापट यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात पुणे लोकसभा पोटनिवडणूकीच्या चर्चेला उधाण

धनश्री ओतारी

भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात पुणे लोकसभा पोटनिवडणूकीच्या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांनी पुण्यात लोकसभा पोटनिवडणुक लढवणार असल्याची घोषणा केलीय. मात्र, निवडणुक आयोगाकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी मौन सोडले आहे. (Pune Lok Sabha Bypoll Election jayant patil statement )

गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली. पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही माहिती फेटाळून लावली. त्यानंतर आता जयंत पाटीलही या मुद्यावर भाष्य करत स्पष्टच बोले.

शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

काय म्हणाले जयंत पाटील?

बापट साहेबांचे नुकतेच निधन झाले आहे. पोटनिवडणूकीसंदर्भात आम्ही कोणी ही विचार केला नाही. बापट साहेब यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. शरत पवारदेखील त्यादिवशी सर्व कार्यक्रम रद्द करत गिरीश बापट यांच्या दर्शनासाठी आले होते. आम्ही आमच्या पक्षात अजून पुणे लोकसभा बाबत चर्चा केलेली नाही. अस जयंत पाटील म्हणाले.

९५ साली बापट साहेब विधानसभेत आले होते. माझा त्यांच्याशी जिव्हाळ्याचा संबंध होते. अनेक प्रश्न घेऊन येत होते. त्यांच्या कामाबद्दल विश्वास होता. विधानसभा सदस्यांनी कसं वागावे याचा आदर्श बापट होते. विरोधकाशी चागले सबंध होते. चांगले मित्र होते. राजकीय पोकळी निर्माण झाली अस वाटतं. अशी भावनादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार यांना पुण्यातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की, घाईगर्दीत कोणाला पायात घुंगरु बांधण्याची गरज नाही. गिरीश बापट यांचे निधन होऊन फक्त तीन दिवस झाले आहेत.

मानवता नावाची काही गोष्ट आहे की नाही? राज्याच्या राजकारणाची काही परंपरा आहेत. नीतीमूल्य आहेत. या पद्धतीने वक्तव्य करताना महाविकास आघाडीला लाज का वाटत नाही? इतकी असंवेदनशीलता कशाला? असं म्हणत अजित पवार यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना फटकारले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जवसुलीबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे, RBIची कठोर नियमावली जारी

Tukaram Mundhe: ‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना

घरात ठेवा ही एक छोटीशी वस्तू; नशीब पालटेल, अनुष्का शर्माच्या यशामागेही आहे खास कनेक्शन!

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर विमानतळावर दाखल

Car Accident News : LPG सिलिंडरच्या ट्रकला कारची धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT